Wednesday, 05 Aug, 1.17 pm थोडक्यात

महत्त्वाच्या बातम्या
रामाचा वनवास संपला. मोदींच्या हस्ते मंदिराची पायाभरणी!

अयोध्या | अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमीपूजन सोहळा संपन्न झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला. कित्येक वर्षांनंतर प्रभू रामाचा वनवास संपुष्टात आलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामनामाच्या गजरात भूमिपूजनचा सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत इत्यादी उपस्थित होते.

नरेंद्र मोदी भगवान श्रीरामाच्या चरणी लीन झाले. भगवान श्रीरामांना त्यांनी साष्टांग दंडवत घातला. तसंच रामाची मनोभावे पूजा अर्चा केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळे नियम पाळत हा सोहळा पार पडला.

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हनुमान गढी मंदिर येथे जाऊन पूजा केली. त्यानंतर त्यांनी या परिसरात पारिजातकाच्या वृक्षाचं रोपन केलं. सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास त्यांचं हेलिपॅडवर आगमन झालं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं अयोध्येत स्वागत केलं.

राम मंदिर स्पेशल बातम्या-

भगवान श्रीरामाचरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा साष्टांग दंडवत

भारत आता धर्मनिरपेक्ष राहिला नाही, राम मंदिरावर पाकिस्तान सरकारची टीका

राम मंदिराच्या पायाभरणीसाठी खास चांदीचं फावडं; उत्सुकता शिगेला

सर्व निमंत्रितांना राम मंदिर भूमिपूजनाची आठवण म्हणून मिळणार 'ही' खास भेट

मर्यादा पुरूषोत्तम रामाची तुमच्या मनातील व्याख्या, वाचा राम शब्दाचा व्यापक अर्थ.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top