Thursday, 27 Jun, 2.04 am थोडक्यात

महाराष्ट्र
राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकल्याने घोटाळ्याचे आरोप- चंद्रकांत पाटील

मुंबई | राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकल्याने माझ्यावर घोटाळ्याचे आरोप करतायेत, असं म्हणत महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीने केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांवर भूखंड खोटाळ्याचे आरोप केले होते. याचाच चंद्रकांत पाटलांनी समाचार घेतला आहे.

राष्ट्रवादीने केलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळले आहेत. तसेच वेळ आल्यास जयंत पाटलांवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं, चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

दरम्यान, विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालत चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे.

महत्वाच्या बातम्या

-पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात आज अण्णा हजारेंची महत्वपूर्ण साक्ष

-'तू मुसलमान है ना. तो जय श्रीराम बोल', मुंबईत मुस्लिम तरूणाला मारहाण

-आता माघार नाही, विधानसभा लढवणारच; आशा बुचके आक्रमक

-चंद्रकांतदादा बिनकामाची पाटीलकी सोडून द्या; राजू शेट्टींचा चंद्रकांत पाटलांना टोला

-"मी पुतीन यांच्याशी काय बोलेल, हे तुमचं काम नाही"

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top