Sunday, 17 Nov, 10.44 am थोडक्यात

होम
रोहित पवारांचं बाळासाहेबांना अभिवादन; शिवसेना-काँग्रेसच्या नात्याची करुन दिली 'ती' आठवण

मुंबई | आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे. त्यांनी यासंदर्भात फेसबुक पोस्ट केली आहे.

मी कॉलेजसाठी मुंबईला होतो. मुंबई आणि बाळासाहेब ठाकरे हे समीकरण अगदी लहानपणापासून मनात कोरलेलं होतं. स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या राजकारणाच्या स्टाईलचं मला नेहमीचं कौतुक वाटतं आलं आहे. माझ्या मुंबईतल्या काळात स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या या राजकारणाची स्टाईल जवळून पाहता आणि अनुभवता आली, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

महाराष्ट्राच्या या भूमीला रत्नांची खाण म्हणलं जातं. स्व. यशवंतराव चव्हाण साहेब, स्व.बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवार साहेब यांच्याप्रमाणेच अनेक रत्ने या महाराष्ट्राच्या भूमीने देशाच्या राजकारणाला दिली. मला या सर्वच लोकांचं विशेष यासाठी वाटतं की हे सर्वजण आपल्या निर्णयावर नेहमीच ठाम असत. म्हणूनच राजकारणाचा फायदातोटा न पाहता बाळासाहेबांनी प्रसंगी कॉंग्रेसला देखील पाठिंबा देवू केला. प्रतिभाताई पाटील, तसेच प्रणब मुखर्जी यांसारखे व्यक्ती राष्ट्रपती व्हावेत म्हणून अगदी खुल्या मनाने पाठिंबा दिला, असं ते म्हणाले आहेत.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाचा वेळोवेळी सन्मान केला आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेत सत्ता असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने बाळासाहेब यांच्या स्मृतीनिमित्त कलादालन उभा करण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर केला होता. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने असणाऱ्या या कला दालनाचे उद्घाटन आदरणीय पवार साहेबांनी केले होते. स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीनिमित्त उभा करण्यात आलेली ही कदाचित महाराष्ट्रातील पहिली वास्तू असेल, असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

'जर बाळासाहेब आज असते, तर हे घडलंच नसतं'

सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या भेटीनंतर सत्तास्थापनेबाबत…

थेट भूमिका घेणारी अशी माणसं महाराष्ट्राला लाभली हे आपलं भाग्य आहे असे मी समजतो. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन, असं म्हणत त्यांनी आदरांजली वाहिली आहे. मात्र, फेसबुक पोस्टकरुन रोहित पवार यांनी शिवसेनेची भूमिका बाळासाहेबांना अनुसरुन आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>