Dailyhunt
रोहित पवारांचा महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर, म्हणाले.

रोहित पवारांचा महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर, म्हणाले.

पुणे | परीक्षा घेणाऱ्या कंपन्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करत आहेत. एकाच दिवशी दोन परीक्षा आल्यानं परीक्षार्थींना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. शासनाने संबंधित कंपनीला आदेश देऊन परीक्षा केंद्र बदलण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केली आहे.

आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन सुरु असलेल्या गोंधळावरुन रोहित पवार यांनी सरकारकडे या महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. तसेच यावरून रोहित पवार यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. सगळ्या परीक्षा MPSC मार्फतच घ्या अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. सगळ्या परीक्षार्थींना एसटीचा प्रवास मोफत करु देण्याची मागणीही रोहित पवारांनी केलीये.

उमेदवार मोठ्या कष्टाने अभ्यास करतात आणि आई-वडील पदरमोड करुन मोठ्या आशेने मुलांचा खर्च करतात, पण परीक्षा घेणाऱ्या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळतात, हे योग्य नाही. म्हणून कृपया येत्या काळात सर्व परीक्षा एमपीएसी मार्फतच घेण्यात याव्यात, अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे.

दरम्यान, यापूर्वी तांत्रिक गोंधळामुळे आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलली होती. यावरुन विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांनी मनस्ताप व्यक्त केला होता.

थोडक्यात बातम्या-

'मी मोठी नेता नसल्याचं पवारसाहेब म्हणाले असतील पण मी.'; पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर

भारताच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याचं वर्ल्ड बँकेनं केलं तोंडभरून कौतुक, म्हणाले.

सुजय विखे अन् पार्थ पवार यांचा एकत्र विमान प्रवास, फोटो शेअर करत सुजय विखे म्हणाले.

'या' अटीवरच ईडीने महाराष्ट्रात यावं, नाहीतर येऊ नका - उदयनराजे भोसले

'फडणवीसांच्या काळात कुणी काय केलं ते लवकरच बाहेर काढणार'

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat