मुंबई | शिवसेनेचे संजय राऊत हे कालपासून लीलावती रूग्नालयात आहेत. त्यांना भेटण्यासाठी भाजपचे नेते आशिष शेलार गेले हे गेले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी कमी बोलावं, म्हणजे त्यांची प्रकृती नीट राहिल, असं म्हटलं आहे.
आपले कुणाशी मतभेद असतील. तरी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी लीलावतीत आलो होतो. यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता. संजय राऊतांनी कमी बोलावं म्हणजे प्रकृती नीट राहील, असं शेलार म्हणाले.
संजय राऊत यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना लीलावतीमध्ये दाखल करण्यात आलं.
त्यांच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉक असल्याने त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.
दरम्यान, संजय राऊत यांची विचारपूस करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे शिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,रोहित पवार, हर्षवर्धन जाधव, आशिष शेलार भेटायला गेले होते.

