Tuesday, 11 Aug, 9.37 pm थोडक्यात

महाराष्ट्र
संवेदना जिवंत करणारा शब्दांचा जादूगार हरपला, उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई | प्रसिद्ध गीतकार, गझलकार तसंच शायर राहत इंदौरी यांचं हृयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. (Lyricist Rahat Indori Passes Away) कोरोनाचं निदान झाल्यानंतर त्यांना श्वास घेण्यात अडथळा येत होता. मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या जाण्याने साहित्य विश्वास मोठी पोकळी निर्माण झाली आहे. संवेदना जिवंत करणारा शब्दांचा जादूगार हरपला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी राहत इंदौरी यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे.

हम अपनी जान के दुश्मन को अपनी जान कहते हैं, मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं..' सारख्या शेरो-शायरीच्या माध्यमातून कोट्यवधी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवणारे प्रसिद्ध शायर राहत इंदौरी साहेबांचं निधन ही भारतीय कला, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी आहे, असं अजितदादा म्हणाले.

राहत इंदौरी यांच्या काळाच्या पडद्याआड जाण्याने सामाजिक विषयांवर मार्मिक भाष्य करणारा, भावना, वेदना, संवेदनांना जिवंत करणारा, शब्दांचा जादूगार हरपला आहे, अशा भावना अजितदादांनी व्यक्त केल्या.

आज सकाळीच राहत इंदौरी यांनी त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. तसंच पुढील उपचारसाठी रूग्णालयात दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं होतं. श्वास घेण्यात त्यांना अडथळा येत होता. अखेर वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी ऑरबिंदो रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Lyricist Rahat Indori Passes Away)

प्रणब मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक, सर्जरीनंतर तब्येतीत सुधारणा नाही

आनंदाची बातमी- राज्यात आज १० हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी

बाळासाहेब थोरात खोटं बोलतायेत, केंद्राने दूध भुकटी आयात केली नाही- सदाभाऊ खोत

काँग्रेसने कोरोनाग्रस्त केंद्रीय मंत्र्याला पापड पाठवले, कारण.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top