Wednesday, 26 Feb, 12.12 pm थोडक्यात

महाराष्ट्र
सावरकरांचं योगदान विसरुन चालणार नाही- अजित पवार

मुंबई | विधिमंडळ अधिवेशानात आज विनायक दामोदर सावरकरांचा मुद्दा चांगलाच गाजणार आहे. भाजप या मुद्द्यावरुन शिवसेनेला घेरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावरकरांविषयी भाष्य केलं आहे.

महापुरुषांच्या कामावरुन वाद निर्माण होऊ नये. सावरकरांचं अनेक क्षेत्रात योगदान आहे हे विसरुन चालणार नाही. यावरुन उगाच वाद निर्माण करु नये. काही पक्ष वाद निर्माण करुन समाजात गैरसमज पसरवत आहेत, असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर टीका केली.

सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजपचा महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न आहे. भाजपने अधिवेशनात सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे शिवसेना यावर काय भूमिका घेते हे बघावं लागेल.

दरम्यान, सावरकरांच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. कामकाज सल्लागार समीतीच्या बैठकीत हा प्रस्ताव आणण्याचा भाजपने आग्रह केला होता. मात्र, सत्ताधारी पक्षांनी याला विरोध केल्याने भाजपने टीका केली आहे.

दिल्लीची इतकी बदनामी याआधी कधीच झाली नव्हती; शिवसेनेची भाजपवर टीका

पवारांशी पंगा घेणं पडलं महागात? कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदाराला अटक

बांगड्या घालण्याच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना जोरदार प्रत्युतर

शिवसेनेच्या हिंदुत्वाची परिक्षा!; सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजप आक्रमक

राज्यातील 305 शाळा बंद करण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top