Saturday, 14 Dec, 11.04 am थोडक्यात

महाराष्ट्र
"सेना-भाजपने एकत्र आवाज उठवलेला, आता बांगलादेशी घुसखोरांना मुंबईतून हाकला"

मुंबई | देशात 'नागरिकत्त्व सुधारणा विधेयक' लागू झाला आहे. या पार्श्वभूमीवर
मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी करा, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुंबईतील शिवाजी नगर, गोवंडी, चांदिवली, तर ठाण्यातील मिरा रोड, भाईंदर, नवी मुंबई या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर आहेत. संसदेनी आता नागरिकत्व सुधारणा (कॅब) कायदा मंजूर केला आहे, त्याची त्वरित अंमल बजावणी करावी आणि घुसखोरांची हकालपट्टी करावी, अशी मागणी सोमय्यांनी पत्राद्वारे केली आहे.

शिवसेना काँग्रेसनं एकत्र येऊन आवाज उठवल्याचंही सोमय्यांनी पत्रात नमूद केलं आहे. लोकसभेत काँग्रेसने 'नागरिकत्त्व सुधारणा विधेयक'ला विरोध केला होता, तर शिवसेनेने पाठिंबा दिला होता.

दरम्यान, नागरिकत्व कायद्यावरुन महाविकासआघाडीतच मतभेद असल्याचं समोर आलं आहे. कायदा महाराष्ट्रात लागू करु नये, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. तर योग्य वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

आता कुणालाही भाऊ म्हणायला भीती वाटते- पंकजा मुंडे

आज दुपारी विरोधीपक्षांची बैठक; 1 वाजता पत्रकार परिषद

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top