Friday, 24 Sep, 10.36 am थोडक्यात

महाराष्ट्र
शाळा सुरू करण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले.

मुंबई | कोरोना महामारीमुळे जवळपास गेल्या दीड वर्षापासून शाळांना लागलेली कुलूपे अद्याप उघडण्यात आली नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत फारशी वाढ झाली नाही. यामुळे पुढील 15 दिवस कोरोनाचा आढावा घेवून दिवाळीनंतर शाळा सुरु करण्यात येतील, असं चाईल्ड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. बकुळ पारेख यांनी सांगितलं आहे.

राज्यभर खूप वेगानं लसीकरण चालू आहे. तिसरी लाट येण्याआधीच तिला रोखण्यात देशाला यश मिळताना दिसत आहे. यामुळे अनेक तज्ञ लोक दिवाळीनंतर शाळा सुरु करण्यात काही हरकत नाही, असं मत मांडत आहेत.

याविषयी बोलताना डॉ. बकुळ पारेख म्हणाले की, राज्य शासनाला सीटीएफकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. आपापल्या जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेवून स्थानिक प्रशासन आणि अधिकारी शाळा सुरु करू शकतील. परंतू त्याअगोदर मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

तसेच सर्व शाळा एकत्र सुरु करण्याऐवजी टप्याटप्याने सुरु करणे योग्य राहील, असं देखील पारेख यांनी म्हटलं आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने लसीकरण झालेल्या शिक्षकांची यादी देखील मागवली आहे. यामुळे लवकरच शाळा सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत.

थोडक्यात बातम्या -

'भारताने जे केलं ते कोणीही करू शकला नाही'; सर्वोच्च न्यायालयाने केलं केंद्राचं कौतुक

काय सांगता! अवघ्या 33 हजारांमध्ये मिळतेय बजाज डिस्कव्हर बाईक

आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ, विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर भरघोस चुका

मेहबूब शेख प्रकरणावर राजेश टोपे यांच्याकडून राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट, म्हणाले.

रोहितसाठी नरेन ठरतोय 'गुलीगत धोका'! तब्बल इतक्या वेळा हिटमॅन अडकलाय नरेनच्या जाळ्यात

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top