Sunday, 17 Nov, 7.36 am थोडक्यात

होम
शरद पवार आणि सोनिया गांधी यांची नियोजित बैठक रद्द!

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज रविवारी बैठक होणार होती. मात्र, ही बैठक रद्द करण्यात आली असून ती सोमवारी होणार आहे. याबाबतची माहिती इंडिया टुडेने दिली आहे.

सत्तास्थापनेच्या दृष्टीने शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. शिवसेनेसोबत आघाडी करण्याच्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा होणार होती. त्यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झाले होते. मात्र ही बैठक उद्यावर ढकलण्यात आली आहे.

राष्ट्रवादीने रविवारी आपल्या आमदारांची बैठक बोलावली आहे. राज्यात नव्याने येणाऱ्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे सरकार स्थापनेच्या दिशेने तिन्ही पक्ष पुढे जात आहेत.

दरम्यान, अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी शिवसेनेनं भाजपकडे केली होती. मात्र भाजपने ते देण्यास नकार दिला. त्यामुळे शिवसेनेनं वेगळी वाट धरली आहे.

दिवसातून किमान एकदा तरी मला बाळासाहेबांची आठवण येते- छगन…

रोहित पवारांचं बाळासाहेबांना अभिवादन; शिवसेना-काँग्रेसच्या…

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top