Monday, 18 Nov, 9.12 pm थोडक्यात

होम
शरद पवारांना भेटल्यानंतर संजय राऊत म्हणतात.

नवी दिल्ली | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात काही वेळापुर्वी बैठक झाली. त्यानंतर संजय राऊत हे शरद पवारांची दिल्लीतल्या 6 जनपथ या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर राऊतांनी माध्यामांना या भेटीतल्या मुद्द्यांचा तपशीलांची माहिती दिली.

शरद पवार हे महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांच्याशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आणि इतर मुद्यांवर चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या समस्येवर पंतप्रधानांची भेट घेण्याबाबत चर्चा झाली असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं.

शिवसेना महाराष्ट्रात स्थापन करणार आहे. राज्याला लवकरच लोकप्रिय आणि स्थिर सरकार मिळेल, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

कुणासोबत सत्तास्थापन करण्याबाबत काहीच ठरलेलं नाही. तसेच शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत एकसुत्री कार्यक्रमासाठी कोणतीही बैठक झाली नाही, असं वक्तव्य पवारांनी या पत्रकार परिषद परिषदेत केलं. त्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे.

'अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल…

'मुसलमानांनी ओवैसींवर विश्वास ठेवू नये'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>