Friday, 24 Sep, 11.28 am थोडक्यात

महाराष्ट्र
"सोनियांचा पट्टा गळ्यात बांधलेल्या कागदी वाघाला."; अतुल भातखळकरांची बोचरी टीका

मुंबई | चंद्रपूर जिल्ह्यातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणारी मनुष्यहानी टाळण्यासाठी वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवा. त्यांच्या गळ्यात रेडिओकॉलर बसवून हालचालींकडे लक्ष द्या, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या.

वाघांच्या गळ्यात रेडिओकॉलर बसवण्याच्या सूचनेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

सोनियांचा पट्टा गळ्यात बांधलेल्या कागदी वाघाला मात्र याची गरज नाही, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. अतुल भातखळकर यांनी प्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, वनग्रामात सौरऊर्जेवर चालणारी उद्योग सुरु करून रोजगार पुरवण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. यावर शिवसेनेचे काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

टी-20 विश्वचषकाचं अँथम रिलीज, विराट-पोलार्ड नवीन अवतारात, पाहा व्हिडीओ

'सेना-राष्ट्रवादीच्या संगतीमुळे काँग्रेसच्या 'या' नेत्याची भाषा बिघडली'

'शिवसेनेचे सर्वज्ञानी खासदार संजय राऊत, सांगा आता थोबाड कोणाचं फोडायचं?'

'भारताने जे केलं ते कोणीही करू शकलं नाही'; सर्वोच्च न्यायालयाने केलं केंद्राचं कौतुक

काय सांगता! अवघ्या 33 हजारांमध्ये मिळतेय बजाज डिस्कव्हर बाईक

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top