Saturday, 25 Sep, 4.20 pm थोडक्यात

महाराष्ट्र
"सोनू सूद जिवंत असो वा नसो, लोकांना मोफत उपचार मिळालाच पाहिजे"

मुंबई | लाॅकडाऊनमध्ये स्थलांतरीत लोकांची मदत करुन लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारा अभिनेता सोनू सूद पुन्हा लोकांच्या मनावर राज करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने सोनू सूदवर गंभीर आरोप करत त्याच्या फाऊंडेशनकडे आलेल्या निधीवर प्रश्न उपस्थित केले होते. त्याला अभिनेत्याने नकार दिला होता, मात्र आता सोनू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

एका मुलाखती दरम्यान सोनूने त्याच्या हैदराबादमधील रुग्णालयाबाबत सांगितल आहे. यावेळी त्याने सांगितलं की, आमच्याकडे मदतीसाठी आलेल्या लोकांवर आम्ही हैदराबाद येथे उपचार करतो. मात्र अनेक रुग्णालयांची पायाभूत सुविधा वेगळ्या पातळीवर आहेत. अशातच आम्ही हैदराबादमध्ये रुग्णालय उभारणार असल्याचं सोनूने सांगितलं.

हे रुग्णालय येत्या 50 वर्षांची योजना आहे. ही योजना म्हणजे सोनू सूद जिवंत असो वा नसो, लोकांना या धर्मादय रुग्णालयात उपचार मिळालेच पाहिजे, असं सोनू सूदने म्हटलं आहे. या रुग्णालयासाठी आम्ही आदीच 2 कोटी खर्च केले असल्याची माहिती देखील सोनूने यावेळी दिली आहे.

दरम्यान, माझी स्वप्न मोठी आहेत, मी सध्या एका मिशनवर असल्याचं, सोनूने मुलाखतीत म्हटलं आहे. आम्ही आधीच शाळा आणि अनाथ आश्रमवर काम करत आहोत, असं देखील सोनूने सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

UPSC Result | शेतकरी बापाचे कष्ट फळाला आले; सोलापूरचे शुभम जाधव साहेब झाले

'महाविकास आघाडी सरकारला राज्यात काय चाललय याचा थांगपत्ताच नाही'

मुंबईतल्या शाळा सुरु होणार का?, महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

UPSC Result | लातूरच्या नितीशाचा देशात डंका; 21व्या वर्षीच UPSC परीक्षेत यशाला गवसणी

UPSC मध्ये पहिल्या आलेल्या शुभमला नरेंद्र मोदींचा अमेरिकेतून फोन!

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top