Thursday, 27 Feb, 1.04 pm थोडक्यात

महाराष्ट्र
'सोशल मीडिया'त मराठीच्या वापरात हजार टक्क्यांनी वाढ

मुंबई | सर्वजनिक जीवनात संवादाची भाषा हिंदी आणि इंग्रजी झाल्याचं दिसून येत आहे. मात्र सोशल मीडियावर व्यक्त होताना लोक मराठी भाषेचा वापर करत आहे. युनिकोड तंत्रज्ञानामुळे मोबाईलवर देवनागरी लिपी लिहिणं सोपं झालंय.

आपण बोलेल ते उमटत असल्याने मराठी भाषेचा वापर वाढला आहे. गेल्या काही वर्षात मराठी वापराचं प्रमाण 800 ते हजार टक्क्यांनी वाढलं आहे.

भारतात 50 कोटींपेक्षा जास्त लोक इंटरनेट वापरतात. त्यात अँड्रॉइड मोबाइल वापरणाऱ्या लोकांच्या भाषेसंदर्भात विश्लेषण करण्यात आलं. त्यात 75 टक्के लोक मातृभाषेतून माहिती शोधत असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, केपीएमजी आणि गुगल या सल्लागार कंपन्यांनी केलेल्या पाहणीत 2021 अखेरपर्यंत भारतातील 20 कोटींहून अधिक लोक इंटरनेट हिंदीतून वापर करतील, तर मराठीतून वापर करणाऱ्यांची संख्या 5 कोटींचा टप्पा ओलांडेल.

'वारिस पठाणांच्या वक्तव्यामुळे दिल्ली पेटली'

अनिल काकोडकरांपेक्षा वर्षा गायकवाड बुध्दीमान आहेत का?; विनोद तावडेंची टीका

'अटकेपासून वाचण्यासाठी बाळासाहेबांनी आणीबाणीत इंदिरा गांधींशी मांडवल्ली केली होती'

बांगलादेशी-पाकिस्तानी घुसखोरांची माहिती देणाऱ्यास मनसे देणार बक्षिस!

ही दडपशाही बघून हिटलरने सुद्धा शरमेने मान खाली घातली असती- जितेंद्र आव्हाड

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top