Friday, 24 Sep, 12.12 pm थोडक्यात

महाराष्ट्र
#सोयाबीन! आपल्याकडे बाकी सगळं ट्रेंड होत पण शेतकऱ्यांच्या व्यथा नाही- हेमंत ढोमे

मुंबई | सोयाबीनच्या दरात 40 ते 50 टक्क्यांनी सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. मागील आठवड्यात सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण होत पाच ते साडेपाच हजारांवर येऊन थांबले आहेत. देशातील महत्वाचं पीक म्हणून सोयाबीन या पिकाला शेतकरीवर्ग प्राधान्य देत आहेत. मात्र पिकाच्या काढणीवेळी दर घसरल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेता हेमंत ढोमेने हळहळ व्यक्त केली आहे.

आपल्याकडे बाकी सग्गळं ट्रेंड होतं पण शेतकऱ्यांच्या व्यथा तिथल्या तिथेच, असं हेमंत ढोमेने म्हटलं आहे. याबाबत त्याने ट्विट केलं आहे. त्यासोबतच त्याने दुर्दैवं, सोयाबीन असे हॅशटॅग वापरले आहेत.

सोयाबीनच्या घसरलेल्या दरासाठी शेतकऱ्यांच्या मुलांपासुन ते राजकारणातील नेते मंडळी आणि पत्रकार हा हॅशटॅग मध्ये सहभागी होताना दिसत आहेत. सोशल मीडियावर फेसबुक, ट्विटर सारख्या माध्यमांवर हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

दरम्यान, मागच्या चार दिवसांपुर्वी 10 हजार प्रती क्विंटल सोयाबीनचा दर होता. काल त्यात मोठी घसरण होवून प्रती क्विंटल 5500 ते 5700 दर झाला आहे. सोयाबीनच्या दरवाढ झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

'एक दिवस सगळे संघ पाकिस्तानात खेळायला येतील'

'माझ्याकडे 500 पुरावे'; छगन भुजबळांविरोधात शिवसेना आमदाराची धाव

'सोनियांचा पट्टा गळ्यात बांधलेल्या कागदी वाघाला.'; अतुल भातखळकरांची बोचरी टीका

पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या! मोदींच्या भेटीनंतर कमला हॅरिस यांनी दिला पाकिस्तानला इशारा

'या' लोकांना कोरोना लस घरीच मिळणार, केंद्राने घेतला मोठा निर्णय

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top