Monday, 14 Jun, 6.36 pm थोडक्यात

महाराष्ट्र
सुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी वाचून बसेल धक्का

मुंबई | सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वत्र एकच गोंधळ उडाला होता. हा प्रसिद्ध अभिनेता प्रचंड हुशार असून तो असं काही करुच शकत नसल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. एवढच नाही तर त्याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आलं असल्याचं देखील अनेकांनी म्हटलं होतं. सुशांतच्या आत्महत्येचं गुढ कायम असून त्याच्या ट्विटर कव्हर फोटोमुळे आता अनेक प्रश्न समोर आले आहेत.

सुशांतला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आवड होती. यादरम्यान तो ग्रहांचा, वेगवेगळ्या गणितांचा अशा अनेक गोष्टींचा आभ्यास करत होता. सगळे लोक त्याला मल्टीटॅलेंटेड देखील म्हणत असत. अशातच सुशांतच्या ट्विटर अकाऊंटच्या कव्हर पेजला एका प्रसिद्ध कलाकाराने केलेल्या पेंंटींगचा फोटो आहे. मात्र, या पेंटींगमागे अतिशय थरारक अशी कहाणी देखील आहे. जी कुठेतरी सुशांतच्या आत्महत्येशी जोडली असेल, अशी शक्यता दर्शवली आहे.

सुशांतने त्याच्या ट्विटर कव्हरला ठेवलेल्या पेंटींगच्या कलाकाराचे नाव व्हिनेस गाॅघ असं असून त्या पेंटिंगचं नाव 'स्टारी नाईट्स' असं आहे. ही पेंटींग अतिशय मोठी असून 27 जुलै 1890 रोजी हे पेंटिंग जवळपास पूर्ण होत आले असताना गॉघ यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांची ही पेंटिंग जगप्रसिद्ध झाली. या पेंटिंगमागील भावना सहजासहज कोणालाही समजणं शक्य नाही.

दरम्यान, ज्या चित्रकाराने नैराश्यापोटी आत्महत्या केली होती, त्याचेच चित्र सुशांतने आपल्या ट्विटर हँडलवर ठेवले होते आणि तो सुद्धा नैराश्यात होता, हा एक दुर्दैवी योगायोग आहे की दुसरं काही असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. सुशांतने प्रचंड कष्ट करुन लोकप्रियता मिळवली होती. मात्र, त्याच्या मनात काय सुरू होते, याचा कुणालाच पत्ता लागला नाही. आजही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.

थोडक्यात बातम्या-

छत्रपती शाहू महाराज आणि अजित पवारांच्या लक्षवेधी भेटीनंतर शाहू महाराज म्हणाले.

राज ठाकरे यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त 'या' शहरात मिळतंय 53 रुपयांत एक लिटर पेट्रोल

'हिला कोणीतरी आवरा', योगा व्हिडीओंमुळे राखी झाली ट्रोल

उद्धव ठाकरे 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील? सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या.

उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्या भेटीत नेमकं काय झालं?, वाचा सविस्तर

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top