Tuesday, 07 Jul, 5.36 pm थोडक्यात

होम
सुशांतसिंगच्या 'दिल बेचारा' सिनेमाच्या ट्रेलरचा करिश्मा; केला 'हा' जबरदस्त विक्रम

मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या दिल बेचारा या चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी लाँच करण्यात आला. सुशांतचा हा शेवटचा सिनेमा आहे. सुशांतच्या या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यानंतर चाहत्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. अवघ्या 24 तासांमध्ये या ट्रेलरला सर्वाधिक लाईक्स मिळाले असून याबाबतीत दिले बेचाराने 'अॅव्हेंजर्स एंडगेम'लाही मागे टाकलंय.

'दिल बेचारा' असं त्याच्या चित्रपटाचं नाव असून प्रेक्षकांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या शेवटच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाच्या ट्रेलरला 44 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर युट्यूबवर या ट्रेलरला दोन कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

'अॅव्हेंजर्स एंडगेम'च्या पहिल्या आणि दुसऱ्या ट्रेलरला 32 लाख आणि 29 लाख व्ह्यूज मिळाले होते. 'दिल बेचारा'च्या ट्रेलरला अवघ्या एका तासात 50 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळालेत.

24 जुलै रोजी सुशांतचा हा शेवटचा चित्रपट हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. जॉन ग्रीन यांच्या 'द फॉल्ट इन अव्हर स्टार्स' या कादंबरीवर आधारित चित्रपटाची कथा आहे. सुशांतसोबत प्रमुख भूमिकेत संजना सांघी दिसणार आहे. संजनाचा हा पहिला सिनेमा आहे. मुकेश छाबडाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

आनंदाची बातमी.. गेल्या चार दिवसात १५ हजार रुग्ण बरे होऊन घरी- राजेश टोपे

मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी

कोरोना चाचणीसाठी डॉक्टरचं 'प्रिस्क्रिप्शन' बंधनकारक नाही, मुंबई महापालिकेचा निर्णय

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन, बंगल्यावरील टेलिफोन ऑपरेटरला कोरोनाची लागण

शिवसेना नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश, संजय राऊत म्हणाले..

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top