Monday, 17 Feb, 11.04 am थोडक्यात

होम
सुशिक्षित, संपन्न कुटुंबांत घटस्फोट जास्त होतात- मोहन भागवत

मुंबई | शिक्षण आणि संपन्नता वाढली की अहंकारही येतो. त्यामुळे अलिकडं घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे. सुशिक्षित, संपन्न कुटुंबात अशी प्रकरणी जास्त सापडतात. त्याचा परिणाम कुटुंब दुरावण्यावर होतो, असं असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.

सुशिक्षित, संपन्नता असलेल्या कुटुंबात घटस्फोट होण्याचं प्रमाण जास्त आहे, असं मोहन भागवत म्हणाले आहेत. कुटुंबासह उपस्थित असलेल्या संघाच्या कार्यकर्त्यांना ते संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

लोक छोट्या-छोट्या कारणांवरुन भांडतात. सुशिक्षित कुटुंबात घटस्फोट जास्त होतात. त्यामुळे कुटुंब दुरावली जातात. पण समाज हेही एक कुटुंबच आहे, असंही मोहन भागवतांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.

दरम्यान, स्वयंसेवक संघात करत असलेल्या उपक्रमांंबाबत त्यांनी त्यांच्या कुटुंबाला सांगावे, अशी आमची अपेक्षा आहे. कारण अनेकदा आम्ही जे करतो त्याची निश्चिती करण्यासाठी घरातील महिलांना अधिक कष्टप्रद काम करावं लागत असल्याचं मोहन भागवत म्हणाले आहेत.

काही चुकलं असेल तर माफ करा; अमोल कोल्हे भावूक

'दुसर्‍याला बावळट म्हणता आपला बावळटपणा सगळ्यांना दिसतोय'

केंद्राने पैसे थकवल्यामुळेच राज्यापुढे अर्थिक अडचणी- सुप्रिया सुळे

आर. आर. आबा आणखी 20 वर्ष राजकारणात पाहिजे होते- इंदुरीकर महाराज

'तिघेही एकत्र अंगावर आले, निवडणूक लढले तरी भाजप त्यांना पुरून उरेल'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top