Wednesday, 05 Aug, 1.17 pm थोडक्यात

होम
सुवर्णक्षण! राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला सुरूवात; 'या' मान्यवरांची खास उपस्थिती

अयोध्या | राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात भूमिपूजन सुरू असताना अयोध्येत चैतन्याचं वातावरण पसरलं आहे. यादरम्यान प्रमुख अतिथी म्हणून उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबाई पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत देखील उपस्थित आहेत.

यापूर्वी पंतप्रधानांनी हनुमान गढी मंदिरात पूजा केली. त्यानंतर त्यांनी परिसरात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. सध्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमातील पायाभरणीचा विधी आटोपला आहे.

पंतप्रधान मोदींच्या समवेत इतर सर्व मान्यवर मंडळी आता उपस्थितांना मंचावरून संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मंचावर पाच अतिथींना स्थान असेल. मोदींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्यगोपालदास हे मंचावर उपस्थित असणार आहेत.

दरम्यान, राम मंदिराच्या पायाभरणी समारंभाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या नगरीला दिवाळीचं रूप आलंय. अयोध्येत सगळीकडे रोषणाई करण्यात आली आहे. तसंच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कडक बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.

भारत आता धर्मनिरपेक्ष राहिला नाही, राम मंदिरावर पाकिस्तान सरकारची टीका

राम मंदिराच्या पायाभरणीसाठी खास चांदीचं फावडं; उत्सुकता शिगेला

सर्व निमंत्रितांना राम मंदिर भूमिपूजनाची आठवण म्हणून मिळणार 'ही' खास भेट

अयोध्या तो झांकी है उसके बाद भी बहुत कुछ बाकी है- बबिता फोगाट

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top