मुंबई | आमचे आमदार फुटण्याची आम्हाला अजिबात भिती वाटत नाही. महाराष्ट्रातल्या जनतेने भाजपविरोधी कौल दिला आहे. त्यामुळे कोणताही आमदार फुटण्याचं धाडस करणार नाही. आणि जर तसं कुणी केलंच तर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून त्या आमदारांचा पराभव करेल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
राज्यात सत्तास्थापनेच्या हलचालींना वेग आलाय. त्यात पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी आमदार फुटणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला.
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. याबाबत फडणवीस सरकार गंभीर नाही. फक्त घोषणा करायची आणि अंमलबजावणी करायची नाही, हीच या सरकारची कार्यपद्धती आहे.
दरम्यान, सत्तास्थापनेच्या मुद्द्यावर सेना-भाजपचं एकमत होताना दिसत नाही. अशातच काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून सरकार स्थापन करेन अशा चर्चा रंगत आहेत. आता राज्यात नक्की कुणाचं सरकार स्थापन होतं, हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

