मुंबई | दिल्लीमध्ये झालेल्या घटनेवरून भाजप नेते आशिष शेलारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली होती. शेलारांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
जेव्हा शरद पवार काल फेसबुकवर लाईव्ह बोलत होते तेव्हा तुम्ही काय झोपले होते का?, असा प्रतिसवाल क्लाईड क्रास्टो यांनी आशिष शेलारांना केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
गुड मॉर्निंग आशिष शेलार, झोपेतून उठा आणि ही लिंक चेक करा, असं म्हणत क्रास्टो यांनी पवारांनी मंगळवारी साधलेल्या संवादाची लिंक ट्विट करुन शेलारांना उत्तर दिलं आहे. यासोबतच राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही शेलारांवर निशाणा साधला.
दरम्यान, साठ दिवस थंडीत शेतकरी आंदोलन करत होते. तीन कायदे एका दिवसात पारित केले ते तुमचे पहिल्यांदा पाप आहे. टीव्हीवर येण्यासाठी पवारांचं नाव घेतलं जातं, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

