Sunday, 24 Jan, 9.52 am थोडक्यात

होम
TikTok सह इतर चायनिज अ‍ॅप्सवरील बंदी कायम राहणार!

नवी दिल्ली | मोदी सरकारनं गेल्या वर्षी संपूर्ण देशभरात शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅप टिकटॉकसह इतर चायनिय अ‍ॅप्सवर बंदी आणली होती. ही बंदी सुरुच राहणार असल्याची नोटीस इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मिनिस्ट्रीनं ब्लॉक्ड अ‍ॅप्सच्या उत्तरांची समिक्षा केल्यानंतर हा निर्णय घेत नोटीस पाठवली आहे.

सरकारनं नोटीस पाठवल्यानंतर टिकटॉकच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, आम्ही नोटिशीचं मूल्यांकन करत असून त्यानंतर उत्तर देऊ. भारत सरकारकडून 29 जून 2020 रोजी जारी करण्यात आलेल्या निर्देशांचं पालन करणारी टिकटॉक पहिल्या कंपन्यांपैकी एक होती.

तसंच आम्ही सतत स्थानिय कायदे आणि नियमांचं पालन करण्याचा प्रयत्न करत आहोत. तसंच सरकारच्या कोणत्याही समस्येचं समाधान करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत. आमच्या सर्व युजर्सची गोपनीयता आणि सुरक्षा सुनिश्चित करणं ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं टिकटॉकनं सांगितलं.

दरम्यान, 59 अ‍ॅप्सनंतर सरकारनं गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पुन्हा 118 इतर अ‍ॅप्सवरही बंदी घातली होती.

थोडक्यात बातमी-

आरएसएसमध्ये महिलांचा सन्मान नाही, ही पुरुषवादी संघटना- राहुल गांधी

भाजपच्या हिंदुत्वाला शिवसेनेनं चांगला धडा शिकवला- सुशीलकुमार शिंदे

'केंद्र सरकारचे कान उपटून हातात द्यायला आज बाळासाहेब हवे होते'

सरकारने एल्गार परिषदेला अचानक परवानगी का दिली?- ब्राह्मण महासंघ

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top