Wednesday, 21 Apr, 1.12 pm थोडक्यात

महाराष्ट्र
तिसरं मुल जन्माला घालणाऱ्यांना तुरुंगात पाठवा- कंगणा रणावत

मुंबई | अभिनेत्री कंगणा राणावत सतत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. असंच एक वादग्रस्त वक्तव्य कंगणाने केलं आहे. भारतातील वाढती लोकसंख्यावर कंगणा राणावतने भाष्य करत एक वादग्रस्त वक्त केलं आहे.

देशात लोकसंख्या सतत वाढत असल्याने लोक मरत आहेत. म्हणून तिसरं मुलं जन्माला घालणाऱ्यांना दंड ठोठावावा आणि त्यांना तुरूंगवासाची शिक्षा द्यावी, असं वक्तव्य कंगणा राणावतने केलं आहे. कंगणाचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कंगनाचे हे ट्विट सोशल मीडियावर बरंच चर्चेत आलं आहे. कंगणाच्या या ट्विटवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक कंगणाच्या म्हणण्याला पाठिंबा देत आहेत तर काहींनी कंगणा राणावतला ट्रोल केलं आहे.

दरम्यान, कंगणा लवकरच 'थलायवी' चित्रपटात दिसणार आहे. 'थलायवी' हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री सी. जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. कंगनाचा हा चित्रपट 23 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, पण त्यानंतर कोविडमुळे चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आलंय. निर्माते आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करणार आहेत. मात्र हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार नाही, असं कंगणाने म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

'मित्राच्या बहिणीसोबत जे झालं ते इतरांसोबत होऊ नये'; लोकांना मोफत ऑक्सिजन देणारा अवलिया

मोठी बातमी! शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात

'गरीब कोरोनाग्रस्तांसाठी माझा पगार घ्या'; भाजी विक्रेत्याच्या मुलाच्या मेसेजने डाॅक्टर भारावले

'इतकं लाचार कधीच वाटलं नाही.'; कोरोनाची परिस्थिती सांगताना डॉक्टरला अश्रू अनावर

'भाजपचे नेते रेमेडेसिविर इंजेक्शन विकत घेऊन सरकारला देणार होते, हे सपशेल खोटं'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top