Saturday, 10 Aug, 9.36 am थोडक्यात

महाराष्ट्र
'टीव्ही 9'च्या पत्रकाराला चंद्रकांत पाटलांकडून मंत्रिपदाची ऑफर

मुंबई | मी आज तुम्हाला महाराष्ट्राचा मंत्री करतो. तुम्ही मंत्रीमंडळात येऊन उद्या किती पाऊस पडू शकतो हे सांगा?, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'टीव्ही 9'चे पत्रकार ऋषी देसाई यांना मंत्रिपदाची ऑफर दिली आहे.

सरकार आणि प्रशासनाने हवामान खात्याच्या अंदाजाकडे दुर्लक्ष करत असल्याच्या मुद्द्यावरुन चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारले असता त्यांनी सारवासारव केल्याचं दिसून आलं. तरीही ऋषी देसाई मागे हटले नाहीत.

नियोजन करण्यात सरकार आणि प्रशासन कमी पडलं असं वाटत नाही का?, असा सवाल ऋषी देसाई यांनी चंद्रकांत पाटलांना केला. त्यावरुनच चंद्रकांत पाटलांनी त्यांना थेट सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली.

दरम्यान, चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या ऑफर नंतर हा 'नायक' नावाचा चित्रपट नाही. पंचगंगेचं पाणी वाढत असल्यासंदर्भात लोकांना इशारा न दिल्यानं कोल्हापूर, सांगलीतील लोकांना पूराचा फटका बसला असल्याचं ऋषी देसाई म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-'महाराष्ट्रातल्या जनतेचं मरण तरी गांभीर्याने घ्या'

-सलग सहाव्या दिवशी सांगली पूराच्या पाण्यात; पाण्याची पातळी एक फूटाने उतरली

-महाराष्ट्रातल्या पुरस्थितीबाबत शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना फोन!

-CBI चौकशीचं कारण देत एनडीटीव्हीच्या प्रणय रॉय यांना परदेशी जाण्यापासून अडवलं! रॉय म्हणाले.

-'शिवछत्रपतींची स्त्री निती' पुस्तक मनसेने मुंबई महापौरांना दिलं भेट!

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top