Thursday, 27 Jun, 1.41 pm थोडक्यात

महाराष्ट्र
'तू मुसलमान है ना. तो जय श्रीराम बोल', मुंबईत मुस्लिम तरूणाला मारहाण

मुंबई | झारखंड माॅब लिंचिंगचं प्रकरण ताजं असतानाच मुंब्र्यातल्या कौसा भागात राहणाऱ्या फैजल खान या तरूणाला मारहाण करत 'जय श्रीराम' बोलण्याची जबरदस्ती करण्यात आली आहे.

फैजल कॅबने पॅसेंजरला पिकअप करण्यासाठी आगासन रोडला जात असताना त्याची कार बंद पडली. त्यावेळी तिथून जाणाऱ्या तीन तरूणांनी गाडी का थांबवली? असं विचारत त्याला मारहाण केली. 'अल्लाह के वास्ते मुझे छोड दो' अशी विनंती त्याने केली.

संबंधित तरूणांनी 'तु मुसलमान है, तो जय श्रीराम बोल' अशी जबरदस्ती केली. या प्रकरणासंबंधीची तक्रार फैजलने मुंब्रा पोलीस स्टेशनला दिली होती.

दरम्यान, मंगेश मुंढे, अनिल सुर्यवंशी आणि जयदीप मुंढे या तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

-आता माघार नाही, विधानसभा लढवणारच; आशा बुचके आक्रमक

-चंद्रकांतदादा बिनकामाची पाटीलकी सोडून द्या; राजू शेट्टींचा चंद्रकांत पाटलांना टोला

-"मी पुतीन यांच्याशी काय बोलेल, हे तुमचं काम नाही"

-जिमला निघालेल्या काँग्रेस प्रवक्त्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

-केतकी चितळेला ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई सुरु; एकाला औरंगाबादमधून अटक

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top