Friday, 09 Aug, 7.52 am थोडक्यात

महाराष्ट्र
'त्या' कामासाठी गिरीश महाजनांचं कौतुक करावं लागेल- चंद्रकांत पाटील

सांगली | गिरीश महाजनांना एअर फोर्सच्या हेलिकॉप्टरने सांगलीला जायला नकार दिला तर ते बोटीने किणी ओलांडून विटा मार्गे सांगलीला गेले, त्यांचं कौतुक करावं लागेल, असं म्हणत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गिरीश महाजनांच्या 'सेल्फी' प्रकरणाकडे दुर्लक्ष करत त्यांची पाठराखण केली आहे.

सांगली- कोल्हापूर भागात सध्या गंभीर पूरस्थिती आहे. लोकांचे अतोनात हाल होतायेत. तर दुसरीकडे पूरपरिस्थितीच्या पाहणीदरम्यान गिरीश महाजनांचा बोटीत बसून हसलेला 'सेल्फी' व्हायरल होतोय.

महाजनांच्या या सेल्फीवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. चंद्रकांत पाटील यांनी मात्र महाजनांची पाठराखण केली आहे.

समाजाला सेल्फी नावाचा रोग लागलाय. कुठेही जा सेल्फी काढतात… अशा वेळी आपण दोष कोणाला देणार? सेल्फी काढणाऱ्या कार्यकर्त्याला की सोबतच्या माणसाला…? असा प्रश्न उपस्थित करत पाटलांनी एकप्रकारे महाजनांची यात चूक नसल्याचंच दर्शवलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-शरद पवार बारामतीत आले अन् तासात पूरग्रस्तांसाठी 1 कोटी रूपये जमा झाले!

-पूरग्रस्तांसाठी खासदार उदयनराजेही उतरले फिल्डवर

-ताई. 'उलटा चोर कोतवाल को डाँटे' ही कामे बंद करा; मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार

-'महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारवर हत्येचा गुन्हा दाखल करा'

-पूरग्रस्तांसाठी राज्य शासनाची मोठी घोषणा.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top