Sunday, 27 Oct, 9.36 am थोडक्यात

महाराष्ट्र
"त्या वाक्याने जी घायाळ झाले ते उठलेच नाही"

मुंबई | राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांनी तब्बल 30 हजारांहून अधिक मताधिक्य घेत भाजपच्या पंकजा मुंडे यांचा दणदणीत पराभव केला. या पराभवानंतर पंकजा मुंडे यांची एक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

विश्वास ठेवा मी त्या क्लीप मधील वाक्याने जी घायाळ झाले ते उठलेच नाही. हा पराभव पंकजा गोपीनाथ मुंडेंचा आहे. कारण तो हवा होता अनेकांना म्हणूनच झाला असावा, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.

खूप काही जिल्ह्यासाठी स्वप्न होती ती राहिली सल एवढीच आहे. चला मग रजा घेते,सामाजिक कर्तव्यातून नाही पण पराभूत लोकप्रतिनिधी म्हणून. पत्ता कळवते. , असं या व्हायरल पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, मला मतं मिळाली नसतीलही, मला मन जिंकताही आली नसतील पण एक मात्र नक्की आहे असत्य मला वागता आलं नाही हे शत्रूही कबूल करेल, असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

'कोथरुडमधील बहिणींना साड्या वाटणारच'

'चंद्रकांत पाटील यांच्यामुळेच काँग्रेस आघाडीला…

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top