Wednesday, 15 Sep, 12.44 pm थोडक्यात

होम
उंची वाढवण्याच्या नादात आईने लेकीला दिली आयुष्यभराची शिक्षा!

नवी दिल्ली | मुलांची उंची वाढावी म्हणून पालक अनेक प्रयत्न करतात. मुलांना लहानपणीच व्यायाम करायला लावतात तसेच सायकल चालवायला लावतात. तर अनेक पालक काही औषध देखील देतात. मात्र उंची वाढवण्यासाठी एका महिलेनं जे केलं त्याने सर्वांच्या आंगावर काटा आणला आहे. एका आईने आपल्या मुलीची उंची वाढवण्यासाठी तिचा प्रचंड छळ केला असून आपल्याच लेकीला महिलेने आयुष्यभराची शिक्षा दिली आहे.

मुलीची उंची वाढवावी म्हणून आईने मुलीला दिवसाला 1000 दोरी उड्या मारण्यास सांगितल्या. काही काळाने उड्यांची संख्या वाढली आणि महिलेने लेकीला दिवसाला 3000 दोरी उड्या मारण्यास सांगितल्या. 3000 दोरी उड्या मारताना मुलीला प्रचंड त्रास होत होता. अनेक वेळा मुलीने आईकडे तक्रार देखील केली. मात्र आईने आपल्या लेकीचं काही एक ऐकलं नाही.

आईने हे कृत्य मुलीसोबत सलग 3 महिने केलं. त्यानंतर मुलीचं गुडघे प्रचंड दुखू लागले. त्यामुळे महिलेने आपल्या लेकीला डाॅक्टरांकडे नेलं. यावेळी डाॅक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून आईकडे पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काही उरलं नाही. डाॅक्टरांनी मुलीला ट्रॅक्शन अॅपोफिटीस झाल्याचं सांगितलं. यामध्ये मुलीचं गुडघे कायमचे काम करणं बंद झाले आहेत.

दरम्यान, महिलेने कधीच डाॅक्टरांचा सल्ला घेतला नाही. तसेच मुलीने केलेल्या तक्रारीकडे देखील दुर्लक्ष केलं. मात्र आईला आता केवळ पश्चाताप सोडून दुसरं काहीच करता येणार नाही. ही संपुर्ण घटना चीनमधील जेनजियांग येथील आहे.

थोडक्यात बातम्या-

प्रियंका गांधी 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता!

महिन्याला फक्त 1000 रूपये जमा करा, काही वर्षांनी मिळतील तब्बल 12 लाख रूपये

काळजी घ्या! कोरोनासारखं डेंग्यूही बदलतोय आपलं रुप; धक्कादायक माहिती समोर

.तर मला सामनाचं काम सोडावं लागेल- संजय राऊत

'मायबाप सरकार खरं बोला, पेगॅसस वापरलं की नाही?'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top