Dailyhunt
वाढत्या कोरोनामुळे 'या' देशात भारतीयांना नो एंट्री!

वाढत्या कोरोनामुळे 'या' देशात भारतीयांना नो एंट्री!

नवी दिल्ली | देशात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्र सरकारने अनेक नियम लागू केले आहेत. मात्र तरीही भारतातील कोरोना काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. अशातच न्यूझीलंडने भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतातून न्यूझीलंडमध्ये येणाऱ्या प्रवाशांवर 11 एप्रिल ते 28 एप्रिलपर्यंत बंदी असेल. न्यूझीलंडमध्ये 19 एप्रिल संध्याकाळी 4 वाजल्यापासून हा नियम लागू होईल अशी घोषणा न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांनी केली.

हा नियम भारतातून न्यूझीलंडमध्ये परतणाऱ्या न्यूझीलंडच्या नागरिकांसाठीही लागू असेल.

दिलेल्या कालावधी दरम्यान जर न्यूझीलंडचा नागरिक भारतातून न्यूझीलंडमध्ये जाऊ इच्छित असेल तर त्यालाही परवानगी देण्यात येणार नाही. तसंच त्या व्यक्तीला 28 एप्रिलनंतरच न्यूझीलंडला जावं लागेल.

दरम्यान, सध्या न्यूझीलंडमध्ये कोरोना कमी झाला आहे. ही बंदी पुढेही कायम राहिल किंवा नाही याचा निर्णय परिस्थितीनुसार घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

उदयनराजे म्हणतात, 'सध्या राज्यात काय राजकारण चाललंय हे मलाच कळेना'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

'टक्का कुणाला 'धक्का' देणार, कुणाची नाव 'धक्क्या'ला लावणार?'

'.तरच 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार'

'ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील'; चित्रा वाघ यांचं रूपाली चाकणकरांना प्रत्युत्तर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat