मुंबई | राज्यासह देशात गाजत असणारं आर्यन खान प्रकरण सध्या दररोज नवीन वळण घेत आहे. 2 ऑक्टोबरपासून आजपर्यंत या प्रकरणात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी नवाब मलिक यांच्यावर गंभीर केले आहेत.
समीर वानखेडे प्रकरण हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ट्रिक आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे, असा जहरी टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे. एका अधिकाऱ्याची लाज काढली जाते, तर त्याच्या पत्नीची इज्जत काढली जाते, असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
गेले 12 दिवस समीर वानखेडे दलित आहेत की मुस्लीम अशी चर्चा सुरू आहे. अजित पवारांवर 11 दिवस धाडी सुरू होत्या. त्यांना वाचवण्यासाठी हे प्रकरण सुरू असल्याचं देखील किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. ही सगळी ठाकरे सरकारची बदमाशी सुरू आहे, असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अजित पवारांकडे चिल्लर सापडली होती आणि बिल्डरांकडे 100 कोटी सापडले होते, असं शरद पवार म्हणाले होते. त्यांनीच अजित पवारांना 100 कोटी दिले, असंही सोमय्या म्हणाले आहेत. अलिबाबा चालिस चोरांचे घोटाळे काढणार असल्याचं देखील सोमय्या म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
'सिद्धूंना काही कळत नाही, ते जास्त बोलतात पण त्यांना मेंदू नाही'
'देशाला स्वातंत्र्य 99 वर्षांच्या भाडेतत्वावर मिळालंय'; भाजप प्रवक्त्याचा जावईशोध
शासनाचा सावळा गोंधळ! दिवाळी सुट्ट्यांची तारीख अचानक बदलली
'एकनाथ खडसे स्वत:ला मुख्यमंत्रिपदाच्या पातळीचे समजायचे मग पराभव का झाला?'
मोठी बातमी! नीरज चोप्रासह अन्य 11 खेळाडूंची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

