Friday, 07 Aug, 12.39 am थोडक्यात

होम
'या' कारणाने सुशांतला 4 दिवस झोप नव्हती; सुशांतचा मित्र कुशलचा धक्कादायक खुलासा

मुंबई | सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक उलटसुलट चर्चा सुरु होत्या. यामध्ये सुशांतचं नाव MeToo मोहिमेत आलं असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. यावेळी 'दिल बेचारा' चित्रपटातील सुशांतची सहकलाकार संजना संघीसोबत त्याने गैरवर्तन केल्याचे अनेकांनी म्हटलं. पण त्यावर संजनाने वक्तव्य करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. आता सुशांतचा मित्र कुशल जवेरीने याच कारणाने सुशांतला तणावात पाहिलं असल्याचं सांगितलं.

नुकताच कुशलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिलीये. या पोस्टमध्ये कुशल म्हणतो, 'मी सुशांतसोबत जुलै 2018 पासून ते फेब्रुवारी 2019 पर्यंत राहत होतो. मी त्याला ऑक्टोबर 2018 मध्ये सर्वात जास्त त्रासात पाहिलं होतं. कारण मीडियाने कोणताही पुरावा नसताना त्याच्यावर निशाणा साधला होता. आम्ही संजना संघीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण ती अमेरिकेला गेली असल्यामुळे तिने यावर वक्तव्य केलं नव्हतं'

सुशांतकडे पुरावे नसल्यामुळे तो या आरोपांवर बोलू शकत नव्हता. मला आजही आठवतं त्याच्यावर लावण्यात आलेल्या MeeToo आरोपांमुळे त्याला चार दिवस झोप नव्हती. तो संजनाने हे आरोप खोटे असल्याचे सांगण्याची वाट पाहात होता. पाचव्या दिवशी संजनाने हे आरोप खोटे असल्याचे सांगितलं, असंही कुशलने सांगितलं आहे.

याप्रकरणाबाबत स्पष्टीकरण देताना संजना संघी म्हणाली होती की, 'सुशांतने माझ्यासोबत गैरवर्तन केल्याचं सगळीकडे पसरलं होतं. त्यावेळी सुशांतला खूप त्रास झाला होता. पण आम्ही कधीच त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आमची मैत्री कायम ठेवली आणि त्याच्यावर जे आरोप करण्यात आले होते, तसे आमच्यात काहीच झालं नव्हतं. या सगळ्या अफवा आहेत हे लोकांना कसं समजवायचं हेच आम्हाला कळत नव्हतं.'

सुशांत आत्महत्याप्रकरणी सीबीआयकडून 6 जणांवर गुन्हा दाखल

'अयोध्येत मस्जिद होती, आहे आणि राहील सरकारने ताकदीच्या बळावर बदलला कोर्टाचा निर्णय'

'हवं तर तुम्हाला साष्टांग दंडवत घालतो पण, यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा'

रियाने ब्लॉक केला होता सुशांतचा नंबर, कॉल डिटेल्स आले समोर

बीसीसीआयने आयपीएलच्या 13व्या सीजनसाठी चिनी मोबाईल कंपनीसोबत केलेला करार मोडला

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top