Tuesday, 04 Aug, 11.16 pm थोडक्यात

होम
'याचसाठी केला अट्टहास.', भूमीपूजनावर आडवणींची पहिली प्रतिक्रिया!

दिल्ली | बुधवारी अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी साडेबारा भूमिपूजन केलं जाणार आहे. या भूमिपूजनाबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची प्रतिक्रिया समोर आलीये.

राममंदिर आंदोलनातील लालकृष्ण अडवाणी प्रमुख चेहरा होते. लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलंय, जीवनात काही स्वप्न पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो. माझ्या हृदयाच्या जवळील एक स्वप्न होतं, ते पूर्ण होतंय. अयोध्येत राम जन्मभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन होतंय. निश्चित हे माझ्याच नाही देशातील करोडो लोकांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे.'

'श्री रामजन्मभूमी येथे भव्य राम मंदिर बांधणं हे भारतीय जनता पार्टीचं स्वप्न आणि मिशन आहे. भाजपने मला 1990 मध्ये रामजन्मभूमी चळवळीच्या वेळी सोमनाथ ते अयोध्या या रथ यात्रेची जबाबदारी दिली होती. या प्रवासाने असंख्य लोकांच्या आकांक्षा, ऊर्जा प्रेरित केल्या. याप्रसंगी राम मंदिर चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या, बलिदान देणाऱ्या, सर्व संतांचे, नेत्यांची आणि लोकांची मी कृतज्ञता व्यक्त करतो,' असं लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं.

देशात सध्या कोरोनाची साथ आहे. संपूर्ण जगालाच हे संकट सतावतंय. अशा वातावरणात प्रभू रामचंद्र मंदिराचा सोहळा अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाला लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी हे ज्येष्ठ नेते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणारेत.

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणार, निधी कमी पडू देणार नाही, अजितदादांचा शब्द

संस्कृत सर्व भाषांचं उगमस्थान, केवळ गुणगान करून संस्कृत वाढणार नाही तर.- राज्यपाल कोश्यारी

'शासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर झालाच पाहिजे, त्रुटी लवकरात लवकर दूर करा'

लालपरी धावणार सुसाट. एसटी महामंडळासाठी अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय

सुशांतसिंग राजपूत प्रकरणी भाजप नेते नारायण राणे यांचे अत्यंत धक्कादायक आरोप

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top