Friday, 25 Sep, 12.36 pm थोडक्यात

महाराष्ट्र
"यंत्रणा कंगणावर इतकी मेहरबान का?, ड्रग्जप्रकरणी एनसीबीने कंगणाचीही चौकशी करावी"

मुंबई | व्हॉट्सअ‍ॅपवरील संभाषणाच्या आधारे बॉलिवूडमधील काहींना केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, आपण ड्रग्ज घेत होतो, अशी कबुली देणाऱ्या अभिनेत्री कंगणाची चौकशी का केली जात नाही, असा सवाल काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केलाय.

कंगणाचा ड्रग घेतल्यासंदर्भातील व्हिडीओ हा पुरावा आहे, असं असताना तिची चौकशी का केली जात नाही? यंत्रणा कंगणावर इतकी मेहरबान का? असं सावंत म्हणालेत.

दरम्यान, कंगणा राणावतची देखील एनसीबीने ड्रग्जप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

तपासाचा अधिकार एनसीबीला नाही, सीबीआयला आहे- रिया चक्रवर्ती

डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरोना संकटावर मात करू- सुभाष देसाई

कृषी विधेयकांविरोधात शेतकरी संघटनांकडून 'भारत बंद'चा नारा

'गुप्तेश्वर पांडे DGP होते, मात्र भाजप नेत्यासारखे बोलायचे'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top