Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
२००९ च्या वसंत डावखरे प्रकरणात उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब

२००९ च्या वसंत डावखरे प्रकरणात उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब

२००९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात झालेल्या शिवसेनेच्या सभेत दाखविण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह सीडी प्रकरणी दाखल मानहानीच्या खटल्याची आज कल्याण न्यायालयात सुनावणी झाली.

या प्रकरणात न्यायालयाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज 5 ऑगस्ट रोजी कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. यानुसार उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते.

तत्कालीन लोकसभा उमेदवार वसंत डावखरे यांनी, २००९ च्या लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदारसंघात प्रचारसभेदरम्यान सीडी दाखवून आपली बदनामी करण्यात आल्याचा आरोप करत कोळशेवाडी पोलीस ठाण्यात मानहानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार आनंद परांजपे आणि सभा आयोजक रमाकांत देवलेकर यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. गेल्या १७ वर्षांपासून हा खटला कल्याण न्यायालयात प्रलंबित आहे.

या प्रकरणात आतापर्यंत सुमारे 29 साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या असून खटला अंतिम टप्प्यात आला आहे. आज न्यायाधीश संतोष आगे यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवला. या प्रकरणातील आरोप निराधार असून, हा खटला खोटा असल्याचे त्यांनी आपल्या जबाबात नमूद केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जबाब उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवला जाणार आहे. तसेच आनंद परांजपे आणि रमाकांत देवलेकर हे न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहून आपले जबाब नोंदवणार आहेत.

Weather Update : महाराष्ट्रासह अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा, IMD चा अलर्ट

PF काढणे झाले सोपे! EPFO च्या नव्या नियमांचा कर्मचाऱ्यांना मोठा फायदा

२००९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात झालेल्या शिवसेनेच्या सभेत दाखविण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह सीडी प्रकरणी दाखल मानहानीच्या खटल्याची आज कल्याण न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणात न्यायालयाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज 5 ऑगस्ट रोजी कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. यानुसार उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra