गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे नीट पेपरफुटी प्रकरणाच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरु आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तसेच नीट पेपरफुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांना तसेच कुटुंबाला तणाव सहन करावा लागला त्यांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन सुरु होतं.
या आंदोलनाला आज मोर्चाचं रूपांतर आलं. दिल्लीत आज जंतर मंतरपासून संसदेपर्यंत सीजेपीचा मोर्चा निघाला आहे. परंतु या मोर्च्याला सुरुवात होण्यापूर्वीच कालपासून दिल्लीत पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दिल्लीतील मेट्रो स्टेशन आज बंद ठेवण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे.
खासदार संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी संजय राऊत यांनी सरकार घाबरलं आहे अशी टीका केलीय. संजय राऊतांनी पोस्ट मध्ये लिहिलंय, 'सरकार पोरांना घाबरलेय! शुद्ध मराठीत सांगायचे तर ५६ इंच वाल्यांची हातभार फाटलीय! डरो मत! संसदेवरील मार्चला परवानगी नाकारली; शक्य असते तर जंतर मंतर वरील लाखो लोकांना ED लावली असती ;पण ते कठीण आहेमोर्चा चा मार्ग ED च्या दिशेने वळवायला हवा! Ed,सुप्रीम कोर्ट या सारख्या संस्था मोदी शहांच्या गुलाम झाल्या आहेत! ' अशी टीका त्यांनी केली.
तसेच पत्रकार परिषदेत देखील राऊतांनी सरकारवर घणाघात केला आहे. 'आंदोलकांना किड्या-मुंग्यांसारखे चिरडून टाकता येईल, अशी सरकारची मानसिकता होती. तसेच, सर्वोच्च न्यायालयही सरकारचे गुलाम झाल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने आंदोलकांशी संवाद साधायला हवा होता. विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला असता, तर युवा पिढीचे समाधान झाले असते. मात्र, सरकार तरुणांचा अंत पाहत आहे. सरकारने घेतलेली भूमिका अत्यंत गंभीर आहे. सरकारच्या हातात असते, तर हजारो तरुणांच्या मागे ईडी लावली असती. जर संसदेवर मोर्चा काढण्याची परवानगी नसेल, तर ईडीच्या मुख्यालयावर आंदोलन करण्यात यावे. यासाठी हीच संस्था कारणीभूत आहे.'
Aamir Khan : सलमान खाननंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर? सोशल मीडियावर खळबळगेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे नीट पेपरफुटी प्रकरणाच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरु आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तसेच नीट पेपरफुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांना तसेच कुटुंबाला तणाव सहन करावा लागला त्यांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन सुरु होतं. या आंदोलनाला आज मोर्चाचं रूपांतर आलं. दिल्लीत आज जंतर मंतरपासून संसदेपर्यंत सीजेपीचा मोर्चा निघाला आहे. परंतु या मोर्च्याला सुरुवात होण्यापूर्वीच कालपासून दिल्लीत पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दिल्लीतील मेट्रो स्टेशन आज बंद ठेवण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे.

