Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'आम्ही माफी मागितली नाही मग तुम्हाला अशी अवदसा कशी आठवली?' मोदींच्या व्हिडिओवर संजय राऊतांची टीका

'आम्ही माफी मागितली नाही मग तुम्हाला अशी अवदसा कशी आठवली?' मोदींच्या व्हिडिओवर संजय राऊतांची टीका

दिल्ली येथे झालेल्या आंदोलनात GenZ कडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ करण्यात आला. या पार्श्वभूमीवर मोदींनी काल आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये मोदींनी जंतरमंतर येथे तरुणांनी केलेल्या शिवीगाळाबद्दल खंत व्यक्त केली. 'ही मुलं भरकटलेली आहेत त्यांना दिशा दाखवणं आपलं काम आहे. त्यांना शिक्षा देणं, कोर्टाच्या पायऱ्या चढवणं हे करून आपण परिस्थिती नाही बदलू शकत. आपल्याला त्यांना माफ केलं पाहिजे. कारण माझ्या मनात एकच भाव आहे, ही मुलं आपलीच आहेत.' असं पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच त्यांनी मुलांना एकत्र येऊन देशासाठी काम करण्याचं आवाहन केलं. मोदींच्या या व्हिडिओ नंतर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.

हा व्हिडिओ म्हणजे मोदींची शरणागीती आहे, अशी टीका त्यांनी केली. आम्ही माफी मागितली नाही मग तुम्हाला अशी अवदसा कशी आठवली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 'ते भ्रमिष्ट झाले आहेत. मनाने आणि विचाराने भरकटले आहेत. त्यांनी आपले सल्लागार बदलायला हवेत. त्यांची मानसिक स्थिती चांगली नाही. जर माफ करत असाल, तर शेकडो मुलांचे बॅकग्राऊंड कशाला तपासत आहात?' अशी टीका त्यांनी केली.

संजय राऊत यांनी मोदींच्या व्हिडिओवर टीका करताना प्रहार केला, 'मानसिक तज्ज्ञाची गरज मोदींना आहे. तुम्हीच "५० लाख की गर्लफ्रेंड" असं म्हणाला होता. तुम्हीही आई-बहिणीवरून बोलला होता. कोणी तुमच्या आई-बहिणीबद्दल बोललं नाही; तो फक्त उद्रेक होता. याच मुलांच्या मदतीने तुम्ही २०१४ मध्ये सत्तेत आलात. या काही शिव्या नाहीत; महाराष्ट्रातील जनता तुम्हाला शिव्या घालत आहे.'

मोठी बातमी! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; पुणे शहरासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट

Tukaram Mundhe : खासगी हॉटेलचे परवाने रद्द, मग मंत्रालय कँटीनचे का नाही? FDA अधिकाऱ्यांना हायकोर्टाने सुनावलं

दिल्ली येथे झालेल्या आंदोलनात GenZ कडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ करण्यात आला. या पार्श्वभूमीवर मोदींनी काल आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये मोदींनी जंतरमंतर येथे तरुणांनी केलेल्या शिवीगाळाबद्दल खंत व्यक्त केली. 'ही मुलं भरकटलेली आहेत त्यांना दिशा दाखवणं आपलं काम आहे. त्यांना शिक्षा देणं, कोर्टाच्या पायऱ्या चढवणं हे करून आपण परिस्थिती नाही बदलू शकत. आपल्याला त्यांना माफ केलं पाहिजे. कारण माझ्या मनात एकच भाव आहे, ही मुलं आपलीच आहेत.' असं पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच त्यांनी मुलांना एकत्र येऊन देशासाठी काम करण्याचं आवाहन केलं. मोदींच्या या व्हिडिओ नंतर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra