Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अभिजीत दीपके यांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल; आंदोलनातील कारवाईच्या पार्श्वभूमीवर राजीनाम्याची मागणी

अभिजीत दीपके यांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल; आंदोलनातील कारवाईच्या पार्श्वभूमीवर राजीनाम्याची मागणी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तीव्र आरोप केले आहेत. आंदोलनाच्या वेळी झालेल्या गोळीबारासाठी केंद्रीय गृहमंत्री जबाबदार असल्याचा दावा करत त्यांनी अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिजीत दीपके यांनी विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर आपले मत मांडले.

कॉकरोच जनता पार्टीला बाहेरील निधी मिळत असल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तीव्र आरोप केले आहेत. आंदोलनाच्या वेळी झालेल्या गोळीबारासाठी केंद्रीय गृहमंत्री जबाबदार असल्याचा दावा करत त्यांनी अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिजीत दीपके यांनी विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर आपले मत मांडले. कॉकरोच जनता पार्टीला बाहेरील निधी मिळत असल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित केली.

"जर गृहमंत्री अमित शाह यांच्या काळात बाहेरील फंडिंग होत असेल किंवा एखादी पक्ष बाहेरील मदतीने चालवला जात असेल, तर तो गृहमंत्र्यांचा पराभव आहे," असा आरोप त्यांनी केला.केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावरही दीपके यांनी टीका केली. सरकारमधील काही मंत्री चुकीच्या गोष्टींना पाठबळ देत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, तरुणांना ट्रोल करण्यापेक्षा त्यांच्या अडचणी समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. "हीच तरुण पिढी भविष्यात देश हाताळणार आहे. ही मुले सामान्य कुटुंबातील आहेत," असे ते म्हणाले.शेतकरी नेत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबाबत बोलताना दीपके म्हणाले की, ते स्वतः एका शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे भविष्यातही शेतकऱ्यांच्या समस्यांवर त्यांच्या पाठीशी उभे राहतील.

भाजपकडून कितीही प्रस्ताव आले तरी ते स्वीकारणार नसल्याचे अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावरही टीका केली. देशातील बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधिक गांभीर्याने चर्चा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत बोलताना दीपके यांनी पोलिसांना संविधानाप्रमाणे काम करण्याचे आवाहन केले. आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॅमेरे आणि माध्यम उपस्थित असतानाही पोलिसांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

तसेच, आंदोलनापूर्वी दगडांनी भरलेला ट्रक आणण्यात आला होता, असा दावा त्यांनी केला. आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यासाठी कोणताही पूर्वनियोजित कट रचला गेला होता का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.दरम्यान, अभिजीत दीपके यांनी केलेल्या या आरोपांवर संबंधित पक्ष किंवा प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यांच्या या विधानांमुळे राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

'जनतेने ज्यांना नाकारले, तेच आता विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन…' एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा

२६ जुलै रोजी मुंबईत ठाकरे बंधू करणार शक्तिप्रदर्शन; संयुक्त मोर्चाची दिली हाक

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra