उद्धव ठाकरे, तुमच्या भांडुपच्या अनिल कपूरचं तोंड बंद करा, नाहीतर त्यांच्यावरच ऑपरेशन तुडवा होईल. असा थेट इशारा हिंदुस्थानी भाऊ यांनी दिला आहे. इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर आणि बिग बॉस फेम, जो सोशल मीडियावर हिंदुस्थानी भाऊ म्हणून प्रसिद्ध आहे, त्या हिंदुस्थानी भाऊने थेट संजय राऊतांवर निशाणा साधला आहे तसेच त्यांच्यावर ऑपरेशन तुडवा होईल, असा इशाराही दिला आहे.

उद्धव ठाकरे, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं की तुमच्या नेत्यांना सांभाळा, नाहीतर १५ आमदार व २५ नगरसेवक पक्ष सोडून जातील. सचिन अहिर हा फक्त पहिलाच धक्का आहे. ७ सप्टेंबर ही तारीख लिहून ठेवा. या तारखेपर्यंत खूप काही जाणार आहे. तुमचा भांडुपचा अनिल कपूर ऑपरेशन तुडवा करतो, असं म्हणतो. त्याचं तोंड बंद करा, नाहीतर त्याचंच ऑपरेशन तुडवा होईल, असं हिंदुस्थानी भाऊ म्हणाला.
एवढंच नाही, तर यापुढे त्याने सचिन अहिरची बाजू घेत संजय राऊत यांना दगडी चाळची आठवण करून दिली. संजय राऊत, तुम्ही ऑपरेशन तुडवाची भाषा करता. तुम्हाला माहीत आहे सचिन अहिर कोण आहे? दगडी चाळ, सात रस्ता, अरुण भाई गवळी उर्फ डॅडी यांचं नाव ऐकलं आहे ना? बाळासाहेब म्हणायचे, "तुमच्याकडे दाऊद आहे तर आमच्याकडे अरुण गवळी आहे." अशी आठवण हिंदुस्थानी भाऊंनी संजय राऊत यांना करून दिली.
हिंदुस्थानी भाऊंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठाकरे समर्थक त्यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. तरी या प्रकरणाला आणखी एखादं नवं वळण मिळतं का, ते पाहावं लागेल. तरी या विषयावर आपलं मत काय, हे आम्हाला सांगा.