परभणी जिल्ह्यातील कौसडी गावातील शेतात खेळत असताना तीन वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडल्यामुळे मोठी खळबळ उडाली. शेख अदनान शेख नदीम या चिमुरड्याच्या बोअरवेलमध्ये अडकल्याची बातमी समजताच प्रशासन आणि बचाव पथकाने त्वरित घटनास्थळी पोहोचले.

https://youtu.be/SXsKSPETg_Y?si=Ax2oT7dH_XD97BoJ
त्याला बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आले.अदनान बोअरवेलमध्ये अडकल्यामुळे कुटुंबाची अवस्था बिकट झाली होती. त्याच्या सुटकेसाठी बोअरवेलच्या दोन्ही बाजूने मोठे खड्डे खोदण्यात आले. बचाव पथकाद्वारे अत्यंत सावधगिरीने खोदकाम सुरू होते. त्याच वेळी, घटनास्थळी डॉक्टरांची टीम, ऑक्सिजन सिलेंडर आणि ॲम्बुलन्सची तयारी करण्यात आली होती.
सुमारे तीन तासांच्या थरारक प्रयत्नांनंतर अखेर बचाव पथकाला अदनानला बोअरवेलमधून सुखरूप बाहेर काढता आले. मुलगा बाहेर आल्यावर कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. या बचाव मोहिमेत गावकऱ्यांनीही मोलाची मदत केली.बोअरवेलमधून बाहेर काढल्यानंतर अदनानला त्वरित ॲम्बुलन्समधून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या थरारक घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. चिमुरड्याची सुखरूप सुटका झाल्याने शेवटी सर्वांनीच मोठा दिलासा व्यक्त केला.
Manoj Jarange Patil : 'मी एकटा पडावा म्हणून सरकारचा कट', मनोज जरांगे पाटील यांचे सरकारवर आरोप
'संप मागे घ्या आणि कामावर रुजू व्हा', डॉक्टरांच्या संपावर मुंबई हायकोर्टाचे कडक आदेश
https://youtu.be/SXsKSPETg_Y?si=Ax2oT7dH_XD97BoJ