Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
CNG Rate Hike : महागाईचा फटका! मुंबईत सीएनजी महागलं, नवे दर काय?

CNG Rate Hike : महागाईचा फटका! मुंबईत सीएनजी महागलं, नवे दर काय?

मुंबईत सीएनजीच्या दरात अचानक वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने प्रति किलो ८४ रुपये दर जाहीर केले आहेत, ज्यामुळे ऑटो-टॅक्सी आणि खाजगी वाहनधारकांचा इंधन खर्च वाढणार आहे.

मुंबई आणि उपनगरांतील नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सोने, चांदी, किराणा सामान आणि दूध यांसारख्या गरजेच्या वस्तूंच्या किमती सतत वाढत आहेत. आता या यादीत आणखी एक मोठा खर्च वाढण्याची शक्यता आहे, ती म्हणजे सीएनजीच्या किमतीत वाढ. महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने जाहीर केले आहे की, मुंबई महानगर प्रदेशात सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ झाली आहे.

सुधारित दरानुसार, मुंबईत सीएनजी आता ८४ रुपये प्रति किलो मिळणार आहे. ही वाढ १३ मे २०२६ च्या मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सीएनजीचे दर स्थिर होते, त्यामुळे ही अचानक वाढ वाहनचालकांसाठी मोठा आर्थिक धक्का ठरू शकतो. महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकृत निवेदनानुसार, या दरवाढीचे कारण फक्त स्थानिक नसून जागतिक आर्थिक परिस्थितीशी निगडीत आहे. पश्चिम आशियातील काही देशांतील संघर्ष आणि इराणसह आसपासच्या प्रदेशातील तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा प्रभावित झाला आहे. देशांतर्गत गॅस उत्पादन पुरेसे नसल्यामुळे महागड्या आयातीवर अवलंबून राहावे लागत आहे, ज्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. याबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन यामुळे गॅस खरेदी अधिक महाग झाली आहे. या सर्व घटकांचा थेट परिणाम वाहतूक क्षेत्रावर होणार आहे. मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी हा फटका जास्तच भारी आहे. शहरात सुमारे ४.७० लाख ऑटोरिक्षा आणि १.६० लाख टॅक्सी चालतात. रिक्षा संघटनांच्या मते, सीएनजी दरवाढीमुळे ऑटोरिक्षाचा प्रति किलोमीटर परिचालन खर्च ₹१.०३ ने वाढला आहे. त्यामुळे लवकरच रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यांमध्ये वाढ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

फक्त रिक्षाचालक नाही, तर मुंबईतील 'बेस्ट' बसेस आणि राज्य परिवहनाच्या एसटी बसही सीएनजीवर चालतात. या वाढत्या इंधन किमतींमुळे सार्वजनिक वाहतूक कंपन्यांचे आर्थिक नुकसान वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खाजगी वाहनधारकांसाठीसुद्धा ही वाढ चिंता वाढवणारी आहे. मुंबईत सुमारे ५ लाख खाजगी कार सीएनजीवर चालतात, ज्यांनी पेट्रोलच्या वाढत्या दरांचा पर्याय म्हणून सीएनजी निवडलेला होता. तरीही महानगर गॅस लिमिटेडचा दावा असा आहे की, सीएनजी अजूनही पेट्रोल आणि डिझेलपेक्षा स्वस्त आहे. सध्या सीएनजी वापरल्यास पेट्रोलच्या तुलनेत अंदाजे ४४ टक्के आणि डिझेलच्या तुलनेत ७ टक्के बचत होऊ शकते. पण वारंवार होणाऱ्या दरवाढीमुळे सीएनजीची स्वस्त इंधन म्हणून ओळख सामान्य नागरिकांमध्ये हळूहळू कमी होत असल्याचा अनुभव व्यक्त केला जात आहे.

सिनेमाच्या पलीकडे जाणारा सन्मान…श्रेयस तळपदे निर्मित 'मर्दिनी'

Nashik TCS : Matin Patel, AIMIM , च्या अडचणी वाढणार | Matin Patel | AIMIM

मुंबई आणि उपनगरांतील नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोने, चांदी, किराणा सामान आणि दूध यांसारख्या गरजेच्या वस्तूंच्या किमती सतत वाढत आहेत. आता या यादीत आणखी एक मोठा खर्च वाढण्याची शक्यता आहे, ती म्हणजे सीएनजीच्या किमतीत वाढ. महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने जाहीर केले आहे की, मुंबई महानगर प्रदेशात सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ झाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra