मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशहिताच्या निर्देशांचे पालन करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. इंधन बचत, सरकारी वाहनांचा ताफा कमी करणे आणि परदेश प्रवास रद्द करणे यासह सरकारच्या उपाययोजनांवर त्यांनी भर दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशहितासाठी केलेल्या निर्देशांचे पालन करण्याच्या महत्त्वावर भर दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ' नरेंद्र पंतप्रधान जे काही निर्देश देतात, ते पूर्णपणे देशाच्या हितासाठी असतात. आम्ही आमच्या कुवतीनुसार सर्व शक्य ती पावले उचलत आहोत. नेत्यांचे कृतीजन्य प्रयत्न लोकांपर्यंत पोहोचतात, म्हणूनच मी स्वतः मोटरसायकलने कार्यक्रमासाठी आलो.' मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, शासनाने इंधन बचतीसाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. 'आम्ही सर्व सरकारी वाहनांचा ताफा कमी केला आहे, सर्व परदेश प्रवास रद्द केले आहेत आणि विविध प्रकारे इंधन बचत करून परकीय चलन बचत कशी करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत', असे फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितले की, साताऱ्यात उद्याचे शासकीय कार्यक्रम नियोजनानुसार पार पडतील. कारण त्यावर आधीच खर्च झाला आहे. तथापि, पुढील सहा महिन्यांपर्यंत सरकारकडून अशा मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार नाही. विरोधी पक्षाने पंतप्रधानांच्या आवाहनावर केलेल्या टीकेवर फडणवीस यांनी स्पष्ट भाषेत उत्तर दिलं. 'विरोधी पक्षाला प्रगल्भता यावी लागेल. आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेतली तर जगातील अनेक देश कठोर निर्णय घेत आहेत. पंतप्रधानांनी थोडासा त्याग करायला सांगितला आहे, परंतु विरोधकांनी त्यावर गदारोळ उभा केला, हे योग्य नाही', असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली. त्यांनी इंदिराजी, नरसिंहराव सरकार आणि २०१२ मध्ये पाणीपूरक उपाययोजना करताना चिंदबरम यांनी देखील अशाच पद्धतीचे निर्णय घेतल्याचे उदाहरण दिले. १५ तारखेला पंतप्रधान मोदींचा होणारा परदेश दौरा देखील चर्चेचा विषय ठरला आहे. विरोधकांनी या दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले त्याबाबत फडणवीस म्हणाले की, 'देशाच्या पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे हा अत्यंत मूर्खपणाचा लक्षण आहे. परदेश दौऱ्याद्वारे स्ट्रॅटेजिक अलायन्सेस तयार होतात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होतो.'
देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत म्हणाले की, 'पंतप्रधानांनी विदेशी प्रवास करू नये, असे जे सांगितले आहे, ते टाळता येण्याजोग्या बाबतीत आहे. परंतु जर एखादा व्यापारी परदेशात मोठी डील करत असेल, तर ती रद्द करावी असा अर्थ नाही. या मुद्द्यावर टीका करणाऱ्यांना मी बिनडोकच म्हणतो. दुर्दैवाने मला हा शब्द वापरावा लागत आहे, पण प्रत्यक्षात जे अशी टीका करत आहेत, ते खरेच बिनडोक आहेत', अशी जोरदार टीका करत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या आरोपांवर उत्तर दिलं आहे.
सिनेमाच्या पलीकडे जाणारा सन्मान…श्रेयस तळपदे निर्मित 'मर्दिनी'
Nashik TCS : Matin Patel, AIMIM , च्या अडचणी वाढणार | Matin Patel | AIMIM

