देशभरातील महत्त्वाच्या परीक्षांपैकी एक असलेल्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्याने नीट २०२६ परीक्षेचा पेपर १२ मे रोजी रद्द करण्यात आला. यामुळे परीक्षेसाठी वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसिक नुकसान झाले.
पेपरफुटीमुळे काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना देखील समोर आल्या. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. २१ जून पासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या बॅनरखाली दिल्लीतील जंतर मंतर येथे उपोषण सुरु केलं.
या उपोषणामागे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाला मोर्च्याचे रूप आले आहे. आज देशभरातील तरुण, विद्यार्थी दिल्ली येथे आंदोलन करत आहेत. आंदोलकांनी संसद परिसरात आपला मोर्चा वळवला आहे. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी पोहोचले आहे.
धर्मेंद्र प्रधान, अमित शाह आणि पियुष गोयल यांच्यात चर्चा सुरु आहे. गेल्या एक तासापासून ही बैठक सुरु आहे. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. ज्यासाठी देशभरात आंदोलन सुरु आहे तो केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला ठाण्यातून पाठिंबा; मविआचे केंद्र सरकारविरोधात आंदोलन'५६ इंच वाल्यांची हातभार फाटलीय…' संजय राऊतांचा सरकारवर घणाघात
देशभरातील महत्त्वाच्या परीक्षांपैकी एक असलेल्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्याने नीट २०२६ परीक्षेचा पेपर १२ मे रोजी रद्द करण्यात आला. यामुळे परीक्षेसाठी वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसिक नुकसान झाले. पेपरफुटीमुळे काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना देखील समोर आल्या. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. २१ जून पासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या बॅनरखाली दिल्लीतील जंतर मंतर येथे उपोषण सुरु केलं.

