Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Home Remedies For Dandruff : केसांची काळजी घ्या नैसर्गिक पद्धतीने! घरीच बनवा कडुलिंबाचा हर्बल शॅम्पू

Home Remedies For Dandruff : केसांची काळजी घ्या नैसर्गिक पद्धतीने! घरीच बनवा कडुलिंबाचा हर्बल शॅम्पू

कोंडा आणि खाज यांसारख्या केसांच्या समस्यांवर कडुलिंबाचा हर्बल शॅम्पू हा एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे. कडुलिंबातील औषधी गुणधर्म स्कॅल्प स्वच्छ ठेवून कोंडा कमी करण्यास मदत करतात.

घरच्या घरी सहज तयार होणारा हा शॅम्पू केसांची नैसर्गिक काळजी घेण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

उन्हाळ्यात वाढणारे तापमान, घाम आणि धूळ यामुळे अनेकांना केसांमध्ये कोंड्याची समस्या जाणवते. ही समस्या केवळ सौंदर्याशी संबंधित नसून स्कॅल्पच्या आरोग्यावरही परिणाम करते. कोंड्यामुळे खाज सुटणे, स्कॅल्प कोरडी होणे किंवा कधी कधी जळजळ होणे अशा त्रासांना सामोरं जावं लागतं. या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण बाजारातील केमिकलयुक्त शॅम्पू वापरतात. मात्र, त्यांचा दीर्घकाळ वापर केसांना कमजोर आणि कोरडे करू शकतो. अशावेळी नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित आणि परिणामकारक ठरतात. कडुलिंब हे यासाठी एक अत्यंत प्रभावी नैसर्गिक औषध मानले जाते. कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे गुणधर्म स्कॅल्पवरील जंतू कमी करून कोंडा नियंत्रित करतात आणि केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे कडुलिंबाचा वापर करून घरच्या घरी हर्बल शॅम्पू तयार करणे हा एक उत्तम पर्याय ठरतो.

हा हर्बल नीम शॅम्पू तयार करण्यासाठी मूठभर ताजी कडुलिंबाची पाने, दोन कप पाणी, २ ते ३ चमचे सौम्य लिक्विड साबण, एक टीस्पून कोरफडीचा गर आणि काही थेंब खोबरेल तेल घ्या. सर्वप्रथम कडुलिंबाची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत, जेणेकरून त्यावरील धूळ आणि अशुद्धता निघून जाईल. त्यानंतर एका भांड्यात २ कप पाणी घेऊन त्यात कडुलिंबाची पाने टाकून ते उकळायला ठेवावं. पाणी उकळताना हळूहळू त्यातील पाणी कमी होऊन ते अधिक कडवट आणि औषधी गुणधर्मयुक्त होते. जेव्हा पाणी जवळपास अर्धे राहते, तेव्हा गॅस बंद करून हे मिश्रण थंड होऊ द्यावे. थंड झाल्यानंतर हे पाणी गाळून घ्यावे, जेणेकरून पानांचे अवशेष वेगळे होतील. हा गाळलेला कडुलिंबाचा अर्कच शॅम्पूचा बेस बनतो. यानंतर या कडुलिंबाच्या पाण्यात लिक्विड साबण मिसळा. यामुळे शॅम्पूचा बेस तयार होतो आणि केस स्वच्छ करण्यास मदत होते. अधिक पोषण आणि मॉइश्चर मिळवण्यासाठी त्यात कोरफडीचा गर आणि खोबरेल तेल घाला. कोरफड केसांना थंडावा देते आणि तेल केसांना पोषण व चमक देते. सर्व घटक चांगले मिसळून घेतल्यानंतर आपला नैसर्गिक हर्बल नीम शॅम्पू तयार होतो.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra