१० वर्षे नोकरी पूर्ण झाली नसली तरीही EPFO च्या फॉर्म १०सी द्वारे ईपीसी पेन्शनची रक्कम सहज काढता येते. ही प्रक्रिया ऑनलाइन असून काही मिनिटांत क्लेम करता येतो.
अनेक नोकरदारांना असे वाटते की ईपीसी (EPS-Employee Pension Scheme) मधील रक्कम काढण्यासाठी किमान १० वर्षांची सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे.
मात्र, EPFO च्या नियमांनुसार, जर तुम्ही १० वर्षांपूर्वी नोकरी सोडली तरीही फॉर्म १०सी च्या माध्यमातून ईपीसी मधील शिल्लक रक्कम काढता येते. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून काही मिनिटांत तुमचे पैसे थेट बँक खात्यात जमा होऊ शकतात. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही पेन्शन फंड सुरक्षित असतो.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनुसार (EPFO), नियोक्त्याच्या १२% योगदानापैकी ८.३३% रक्कम EPS मध्ये जमा केली जाते. जर १० वर्षांची सेवा पूर्ण झाली नसेल, तर मासिक पेन्शनचा हक्क मिळत नाही. अशावेळी फॉर्म १०सी चा उपयोग करून जमा झालेली EPS रक्कम काढता येते किंवा ती पुढील नोकरीत ट्रान्सफर करता येते. बेरोजगारी, नोकरी बदल किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतही याचा लाभ घेता येतो. फॉर्म १०सी साठी काही अटी आहेत. १० वर्षांपूर्वी नोकरी सोडलेले कर्मचारी, ५८ वर्षांपर्यंतचे वय असलेले व्यक्ती किंवा १० वर्षांची सेवा पूर्ण करून ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेले कर्मचारी अर्ज करू शकतात. अर्ज करताना UAN, PAN, बँक खाते आणि पत्ता यासारखी माहिती आवश्यक असते.
तसेच बँक पडताळणीसाठी चेक, स्कीम सर्टिफिकेट आणि काही प्रकरणांमध्ये अतिरिक्त कागदपत्रेही लागतात. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया EPFO च्या ई-सेवा पोर्टलला https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface/ येथे भेट द्या. UAN आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा. त्यानंतर Online Services मध्ये जाऊन Claim Form (३१, १९, १०सी, १०डी) निवडा. माहिती तपासल्यानंतर 'Proceed for Online Claim' वर क्लिक करून फोर्म १०सी निवडा. शेवटी OTP द्वारे सबमिट केल्यानंतर तुमचा क्लेम नोंदवला जातो आणि प्रक्रिया पूर्ण होते. या प्रक्रियेच्या मदतीने १० वर्षांपेक्षा कमी सेवा असलेले कर्मचारीही आपला EPS निधी सहजपणे काढू शकतात किंवा ट्रान्सफर करू शकतात, त्यामुळे त्यांचे हक्काचे पैसे सुरक्षित आणि उपलब्ध राहतात.
Devendra Fadnavis : विधानपरिषद निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग, मुख्यमंत्री फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले आम्ही जागावाटपावर…आर्थिक नियोजनाचे सोपे नियम, भविष्यातील पैशाचे गणित समजून घ्या
अनेक नोकरदारांना असे वाटते की ईपीसी (EPS-Employee Pension Scheme) मधील रक्कम काढण्यासाठी किमान १० वर्षांची सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र, EPFO च्या नियमांनुसार, जर तुम्ही १० वर्षांपूर्वी नोकरी सोडली तरीही फॉर्म १०सी च्या माध्यमातून ईपीसी मधील शिल्लक रक्कम काढता येते. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून काही मिनिटांत तुमचे पैसे थेट बँक खात्यात जमा होऊ शकतात. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही पेन्शन फंड सुरक्षित असतो.
आर्थिक नियोजनाचे सोपे नियम, भविष्यातील पैशाचे गणित समजून घ्या
आर्थिक नियोजनाचे सोपे नियम, भविष्यातील पैशाचे गणित समजून घ्या
आर्थिक नियोजनाचे सोपे नियम, भविष्यातील पैशाचे गणित समजून घ्या
आर्थिक नियोजनाचे सोपे नियम, भविष्यातील पैशाचे गणित समजून घ्या
आर्थिक नियोजनाचे सोपे नियम, भविष्यातील पैशाचे गणित समजून घ्या
आर्थिक नियोजनाचे सोपे नियम, भविष्यातील पैशाचे गणित समजून घ्या

