Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांवरून नाशकात राजकारण तापलं; दोन सेना आमनेसामने

खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांवरून नाशकात राजकारण तापलं; दोन सेना आमनेसामने

मुंबईत पावसाळ्यात खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांनंतर आता नाशिकमध्ये देखील खड्ड्यांमुळे अपघात घडल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. कुंभमेळ्याच्या कामासाठी शहरात रस्त्यावर सुरु असलेल्या खोदकामांमुळे रस्त्यावर खड्डे पडून अपघात होत आहेत.

हे अपघात आता सामान्य नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचे पाहायला मिळत आहे. या खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये ४ बळी गेले असून काल ४० वर्षीय निलेश कोतकर या तरुण व्यावसायिकाचा सायंकाळी अपघाती मृत्यू झाला. या संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज महानगरपालिकेत जोरदार आंदोलन छेडले. राजीव गांधी भवन येथे नगरसेवकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत महापौरांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत विशेष महासभा न घेता सत्ताधाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. खड्ड्यांमुळे आतापर्यंत चार नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करत, मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.यावेळी खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या निलेश कोतकर यांच्या पत्नी आणि चार वर्षांच्या मुलीसह कुटुंबीयांनीही महापालिकेत उपस्थित राहून न्यायाची मागणी केली. "खड्ड्यांमुळे आमच्या कुटुंबातील कर्ता पुरुष गमावला. अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार असून प्रशासनाने आमच्या कुटुंबाची दखल घ्यावी," अशी भावनिक मागणी त्यांनी केली.

नाशिकमधील खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूच्या प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय वादात आता शिंदे सेनेने ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे सेनेचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी, आम्ही सत्तेत असलो तरी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन केले असून, या मुद्द्यावर ठाकरे गटच राजकारण करत असल्याचा आरोप केला. पीडित कुटुंबाला आमच्या नगरसेवकांनी महापालिकेत आणले नसून, ते स्वतः आंदोलनासाठी आले होते. मात्र, आमच्या नगरसेवकांनी त्यांना मदत करत न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनात साथ दिली, असे तिदमे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाला वैयक्तिकरित्या एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. तसेच राज्य सरकारकडूनही आवश्यक आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते केशव पोरजे यांनी शिंदे सेनेवर जोरदार टीका करत, सत्तेत असूनही आंदोलन करण्याची भूमिका ही केवळ स्टंटबाजी असल्याचा आरोप केला. शिंदे सेना सत्तेत असेल तर त्यांनी आंदोलन करण्याऐवजी जबाबदारी स्वीकारावी. सत्ता सोडून रस्त्यावर उतरावे, असा टोला त्यांनी लगावला. महापालिकेत शिंदे सेनेचा उपमहापौर असताना पीडित कुटुंबाच्या मदतीसाठी ते पुढे का आले नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणी संबंधित ठेकेदारांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करत, मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना महापालिकेत आणून आंदोलन करणे हे दुर्दैवी असून त्याचा निषेध करतो, असेही केशव पोरजे यांनी म्हटले.

शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; ठाकरे गटाच्या याचिकेवर लक्ष

दिमाखदार वातावरणात पार पडला Parth Pawar आणि Kaynat Dhar यांचा साखरपुडा; पहा फोटोज

मुंबईत पावसाळ्यात खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांनंतर आता नाशिकमध्ये देखील खड्ड्यांमुळे अपघात घडल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. कुंभमेळ्याच्या कामासाठी शहरात रस्त्यावर सुरु असलेल्या खोदकामांमुळे रस्त्यावर खड्डे पडून अपघात होत आहेत. हे अपघात आता सामान्य नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचे पाहायला मिळत आहे. या खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये ४ बळी गेले असून काल ४० वर्षीय निलेश कोतकर या तरुण व्यावसायिकाचा सायंकाळी अपघाती मृत्यू झाला. या संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज महानगरपालिकेत जोरदार आंदोलन छेडले. राजीव गांधी भवन येथे नगरसेवकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत महापौरांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra