Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कॉमनवेल्थ गेम्स 2026 : नाशिकच्या दिलीप गावितला सुवर्णपदक; आदिवासी भागातील तरुणाने देशाचे नाव उज्वल केले

कॉमनवेल्थ गेम्स 2026 : नाशिकच्या दिलीप गावितला सुवर्णपदक; आदिवासी भागातील तरुणाने देशाचे नाव उज्वल केले

कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताच्या पॅरा अॅथलीट्सनी उत्कृष्ट कामगिरी करत इतिहास घडवला आहे. पुरुषांच्या 100 मीटर टी-47 फायनल शर्यतीत नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागातील दिलीप महादू गावितने सुवर्णपदक जिंकून देशाची मान उंचावली.

दिलीपने केवळ 10.71 सेकंदांत ही शर्यत पूर्ण करत स्पर्धेतील विक्रमी आणि या हंगामातील सर्वोत्तम वेळ नोंदवली.

कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताच्या पॅरा अॅथलीट्सनी उत्कृष्ट कामगिरी करत इतिहास घडवला आहे. पुरुषांच्या 100 मीटर टी-47 फायनल शर्यतीत नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागातील दिलीप महादू गावितने सुवर्णपदक जिंकून देशाची मान उंचावली. दिलीपने केवळ 10.71 सेकंदांत ही शर्यत पूर्ण करत स्पर्धेतील विक्रमी आणि या हंगामातील सर्वोत्तम वेळ नोंदवली.

अंतिम शर्यतीदरम्यान एका क्षणी दिलीप चौथ्या क्रमांकावर होता. परंतु, शेवटच्या काही सेकंदांत त्याने कमालीचा वेग दाखवत सर्व स्पर्धकांना मागे टाकले आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. याच स्पर्धेत महाराष्ट्राच्या मोहम्मद बासिलने 10.83 सेकंदांची वेळ घेत रौप्यपदक मिळवले. यामुळे या प्रकारात भारताने सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदके प्राप्त केली.दिलीप गावित हा सुरगाणा तालुक्यातील आदिवासी पाड्यातील असून त्याने अलंगुण येथील शहीद भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतले आहे. त्याच्या या यशाची बातमी गावातील कुटुंबीयांना शिक्षकांच्या फोनद्वारे समजली. गावात वीज उपलब्ध नसल्यामुळे त्याच्या पालकांना स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहता आले नाही.
दिलीपचे वडील महादू गावित यांनी मुलाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, "तो लहानपणापासून धावतच शाळेत जात असे. त्याच्या कष्टाचे आणि जिद्दीचे आज फळ मिळाले आहे. माझ्या मुलाने शाळा, गाव आणि देशाचे नाव उज्ज्वल केले, याचा आम्हाला खूप अभिमान आहे."

दिलीपच्या यशानंतर त्याच्या शाळेमध्ये पालकांचा सत्कार करण्यात आला. या विजयामुळे सुरगाणा तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे.याच दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिलीप गावितचे अभिनंदन केले. "ऐतिहासिक वेग, ऐतिहासिक गौरव" असे म्हणून त्यांनी दिलीपच्या कामगिरीचे कौतुक केले. भारतीय पुरुष पॅरा- अँथलेटिक्सच्या इतिहासात सुवर्णपदक जिंकणाऱ्या पहिल्या खेळाडूंपैकी एक म्हणून दिलीप गावितने देश आणि महाराष्ट्राची मान उंचावली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी रौप्यपदक विजेता मोहम्मद बासिलचेही अभिनंदन केले.

'जनतेने ज्यांना नाकारले, तेच आता विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन…' एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा

२६ जुलै रोजी मुंबईत ठाकरे बंधू करणार शक्तिप्रदर्शन; संयुक्त मोर्चाची दिली हाक

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra