आपण जेव्हा स्वतःचं हक्काचं घर घ्यायला जातो, तेव्हा सर्वात आधी काय बघतो? घराचं लोकेशन कुठे आहे, आजूबाजूचा परिसर कसा आहे, तिथे काय काय सुविधा उपलब्ध आहेत, घराचा कारपेट एरिया किती आहे आणि अर्थातच त्याची किंमत काय आहे!
पण दक्षिण मुंबईसारख्या पॉश भागात जर आता तुम्हाला घर घ्यायचं असेल, तर या सगळ्या गोष्टींशिवाय अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट बघितली जाणार आहे. ती म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात की मांसाहारी! "आ जाओ दिखा दूंगा" असं म्हणत सोशल मीडियावर घराघरांत आणि प्रत्येकाच्या रील्समध्ये प्रसिद्ध झालेला लोकप्रिय प्रॉपर्टी डीलर आणि इन्फ्लुएन्सर 'प्रॉपर्टी ट्रान्सझॅक्शन गुरू' म्हणजेच भावेश कावरे सध्या याच वादग्रस्त मुद्द्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
आपण जेव्हा स्वतःचं हक्काचं घर घ्यायला जातो, तेव्हा सर्वात आधी काय बघतो? घराचं लोकेशन कुठे आहे, आजूबाजूचा परिसर कसा आहे, तिथे काय काय सुविधा उपलब्ध आहेत, घराचा कारपेट एरिया किती आहे आणि अर्थातच त्याची किंमत काय आहे! पण दक्षिण मुंबईसारख्या पॉश भागात जर आता तुम्हाला घर घ्यायचं असेल, तर या सगळ्या गोष्टींशिवाय अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट बघितली जाणार आहे. ती म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात की मांसाहारी! "आ जाओ दिखा दूंगा" असं म्हणत सोशल मीडियावर घराघरांत आणि प्रत्येकाच्या रील्समध्ये प्रसिद्ध झालेला लोकप्रिय प्रॉपर्टी डीलर आणि इन्फ्लुएन्सर 'प्रॉपर्टी ट्रान्सझॅक्शन गुरू' म्हणजेच भावेश कावरे सध्या याच वादग्रस्त मुद्द्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
भावेश कावरेने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरून दक्षिण मुंबईतील ताडदेव या अत्यंत महागड्या आणि पॉश भागातील एका अपकमिंग हाय-राईज इमारतीतील २-बीएचके (2BHK) फ्लॅटचा व्हिडिओ शेअर केला होता. सुमारे ९०० स्क्वेअर फूट कारपेट एरिया, सोबत जोडलेली बाल्कनी, जिथून संपूर्ण दक्षिण मुंबईचा आणि अथांग समुद्राचा मनमोहक नजराणा दिसतो आणि सोबतीला डेडिकेटेड पार्किंग space… या सर्व आलिशान वैशिष्ट्यांसह या घराची किंमत सांगण्यात आली तब्बल साडेसहा कोटी रुपये (Rs 6.5 Crore)! पण या लक्झरियस ऑफरसोबत एक अट अत्यंत ठळकपणे मांडण्यात आली होती, ती म्हणजे 'Only Vegetarian' - म्हणजेच या इमारतीत फक्त आणि फक्त शाकाहारी लोकांनाच घर विकत घेता येईल किंवा राहता येईल! मांसाहारी लोकांना इथे प्रवेशबंदी असेल.
हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर संतापाची एकच लाट उसळली आहे. एका बाजूला मुंबईची बहुसांस्कृतिक आणि कॉस्मॉपॉलिटन ओळख जगभरात प्रसिद्ध असताना, दुसरीकडे अशा प्रकारे खाण्यापिण्याच्या सवयींवरून घर नाकारणे म्हणजे थेट 'फूड अपार्टहाइट' (Food Apartheid) म्हणजेच अन्नाच्या नावाखाली चालणारा सामाजिक भेदभाव असल्याचा गंभीर आरोप नागरिक करत आहेत. सोशल मीडिया युझर्स, स्थानिक नागरिक आणि मराठी तरुण यावर अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया देत आहेत. "ही मराठी माणसाची मुंबई आहे, ही आगरी-कोळी आणि कष्टकरी कष्टकऱ्यांची मुंबई आहे! मुंबईत कुणी काय खावं आणि काय खाऊ नये हे ठरवणारे हे कोण?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. पिढ्यानपिढ्या मासे आणि मटण खाणाऱ्या मुंबईकरांना त्यांच्या ताटातील अन्नावरून हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित ठेवणं हा निव्वळ भेदभाव नसून थेट सामाजिक अन्याय आहे, आणि अशा भेदभाव करणाऱ्यांना योग्य तो धडा शिकवलाच पाहिजे, अशी भावना सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.
या वादाचे राजकीय पडसादसुद्धा अत्यंत तीव्रतेने उमटू लागले आहेत. शिंदे सेनेचे युवा नेते गुर्ज्योत सिंग कीर यांनी या प्रकारावर कडक शब्दांत टीका करत अशा जाहिरातींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत, 'असल्या जाहिराती करणाऱ्या दलालांना दिसेल तिकडे ठोकला पाहिजे,' अशी थेट आणि संतापजनक प्रतिक्रिया कमेंटद्वारे दिली आहे. एवढंच नाही तर अनेक नागरिकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह प्रशासकीय यंत्रणांना टॅग करून अशा प्रकारच्या भेदभाव करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-बंगळुरू प्रवास होणार ५ तासांनी कमी, कधी सुरू होणार सेवा?
Tukaram Munde : डॉमिनोजच्या ३ आउटलेट्सवर FDAची कारवाई, नियमांचं उल्लंघन केल्याने परवाने निलंबित

