मुंबईत देहविक्री व्यवसायात एक मराठी अभिनेत्री अडकली आणि मोठी खळबळ उडाली. हा अत्यंत गंभीर प्रकार गिरगावमधील एका हॉटेलमध्ये उघडकीस आला आहे. गिरगावमध्ये असलेल्या एका टू-स्टार हॉटेलमध्ये हा प्रकार घडला.
या हॉटेलमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांना काही दिवसांआधी मिळाली होती. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी हे प्रकरण समोर आणण्यासाठी तसेच यात समावेश असलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी एक डाव रचला.
मुंबईत देहविक्री व्यवसायात एक मराठी अभिनेत्री अडकली आणि मोठी खळबळ उडाली. हा अत्यंत गंभीर प्रकार गिरगावमधील एका हॉटेलमध्ये उघडकीस आला आहे. गिरगावमध्ये असलेल्या एका टू-स्टार हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. या हॉटेलमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांना काही दिवसांआधी मिळाली होती. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी हे प्रकरण समोर आणण्यासाठी तसेच यात समावेश असलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी एक डाव रचला.
पोलिसांनी या हॉटेलमध्ये २७ जून रोजी एक बनावट ग्राहक पाठवला. त्यानंतर याच ग्राहकाने पोलिसांना हॉटेलमध्ये सुरू असलेल्या काळ्या धंद्याबद्दल माहिती दिली. यानंतर पोलिसांनी या हॉटेलवर धाड टाकली व या धाडीत ३ महिलांना ताब्यात घेतलं. परंतु या ३ महिलांपैकी २ महिला या फसवणुकीला बळी पडल्याने तेथे आल्या होत्या, तर एक महिला ही या २ महिलांना पैशाचं आमिष दाखवून देहविक्री करायला भाग पाडणारी होती. पोलिसांनी या प्रकरणात इतर महिलांची फसवणूक करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
परंतु सर्वात जास्त हे प्रकरण तेव्हा चर्चेत आलं, जेव्हा या देहविक्रीच्या व्यापारात बळी पडणारी एक महिला ही मराठी अभिनेत्री आहे, असं समोर आलं. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या मराठी अभिनेत्रीने काही चित्रपटांमध्ये लीड रोल देखील केले आहेत. तसेच अनेक वेबसीरिजमध्ये देखील तिने काम केलं आहे. आता ही मराठी अभिनेत्री देहविक्रीच्या जाळ्यात कशी अडकली तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
Sachin Ahir : ठाकरेंना धक्का, सचिन अहिरांनी शिवसेनेकडून भरला उपसभापतीपदाचा अर्ज
हिंजवडीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी PMRDAचा मोठा निर्णय; ४ जोडरस्ते नव्याने होणार

