Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मीरा रोडनंतर आता घाटकोपरमधील सोसायटीतही वाद

मीरा रोडनंतर आता घाटकोपरमधील सोसायटीतही वाद

मीरा रोडनंतर आता घाटकोपर येथे देखील बकरी ईदच्या दिवशी बकरा कापण्यावरून वाद निर्माण झाला आहे. घाटकोपर येथील सागर सोसायटीमध्ये हा वाद झाला आहे. या सागर सोसायटीमध्ये गेल्या ३० वर्षांपासून ईदला कुर्बानी दिली जात होती.

मात्र आता या सोसायटीमध्ये देखील बकरा कुर्बानीला इथल्या नागरिकांनी विरोध केला आहे. यानंतर आता महानगरपालिकेने देखील कुर्बानीची परवानगी रद्द केली आहे. आता इथल्या नागरिकांनी महानगरपालिकेला दुसऱ्या ठिकाणी कुर्बानीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.

मीरा रोडनंतर आता घाटकोपर येथे देखील बकरी ईदच्या दिवशी बकरा कापण्यावरून वाद निर्माण झाला आहे. घाटकोपर येथील सागर सोसायटीमध्ये हा वाद झाला आहे. या सागर सोसायटीमध्ये गेल्या ३० वर्षांपासून ईदला कुर्बानी दिली जात होती. मात्र आता या सोसायटीमध्ये देखील बकरा कुर्बानीला इथल्या नागरिकांनी विरोध केला आहे. यानंतर आता महानगरपालिकेने देखील कुर्बानीची परवानगी रद्द केली आहे. आता इथल्या नागरिकांनी महानगरपालिकेला दुसऱ्या ठिकाणी कुर्बानीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.

मीरा भाईंदरमध्ये ईदच्या कुर्बानीवरून झाला होता राडा

पूनम सोसायटीमध्ये बकरी ईदच्या निमित्ताने कुर्बानीसाठी बोकड आणण्यात आला. परंतु यावर बजरंग दलच्या कार्यकर्त्यांसोबतच हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला. या सोसायटीमध्ये मांसाहार न करणारे लोक राहतात. त्यांच्या भावना यामुळे दुखावतील, असं हिंदुत्ववादी संघटनांचं मत होतं. परंतु दोन्ही गटांमध्ये या कारणावरून वादविवाद झाले आणि या वादात एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्यावर ब्लेडने वार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

हे प्रकरण वाढल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सोसायटीच्या बाहेर जमाव जमवत आंदोलन केलं. ही माहिती मिळताच पोलिसांनी या घटनेची संवेदनशीलता लक्षात घेत सोसायटीबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला. हे आंदोलन सुरू असताना मात्र एक कार्यकर्ता थेट डुक्कर घेऊन आला आणि सोसायटीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्या कार्यकर्त्याकडून ते डुक्कर ताब्यात घेत परिस्थिती आटोक्यात आणली.

मीरा भाईंदरमध्ये ईदच्या कुर्बानीवरून झाला होता राडा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra