Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मीस पुणे गर्लची संशयास्पद आत्महत्या ?

मीस पुणे गर्लची संशयास्पद आत्महत्या ?

ट्विशा शर्माचा जन्म नोएडातील असून, ती प्रसिद्ध मॉडेल होती. तिने मिस पुणेचा खिताब जिंकला होता आणि तिच्या आयुष्यात खूप यश मिळाले होते. डिसेंबर २०२५ मध्ये ट्विशा शर्मा भोपाळच्या क्रिमिनल लॉयर समर्थ सिंग याच्यासोबत लग्न केले.

दिनांक १२ मे २०२६, संध्याकाळी ५ वाजता ट्विशा शर्मा आपल्या घराजवळच्या एका ब्युटी पार्लरला गेली. तेथून ती सायंकाळी ६.३० वाजता निघाली आणि निघाल्यानंतर घराजवळील गार्डनमध्ये थोडा वेळ फेरफटका मारला. गार्डनमध्ये फिरल्यानंतर ट्विशा सायंकाळी ७.३० वाजता घरी परतली. नेमकेच घरी आल्यानंतर तिने आपल्या आईला फोन केला. मात्र तिच्या आवाजात थोडी भीती जाणवली. आईसोबत बोलताना अचानक तिचा फोन कट झाला.

https://youtu.be/5VsZrDEAR9Q?si=vTKicgQOSuyjuD7W

घरी सुरु असलेल्या वादामुळे कदाचित ती घाबरली असेल, असे तिच्या आईला वाटले. परंतु थोड्याच वेळाने ट्विशाच्या आईला तिच्या सासूचा फोन आला. ट्विशाला श्वास घेण्यात त्रास होत असल्याचे सांगितले गेले. काही वेळानंतर ट्विशाने आत्महत्या केली आणि तिचा मृत्यू झाल्याचे ट्विशाच्या आईला समजले.

ट्विशा शर्माचा जन्म नोएडातील असून, ती प्रसिद्ध मॉडेल होती. तिने मिस पुणेचा खिताब जिंकला होता आणि तिच्या आयुष्यात खूप यश मिळाले होते. डिसेंबर २०२५ मध्ये ट्विशा शर्मा भोपाळच्या क्रिमिनल लॉयर समर्थ सिंग याच्यासोबत लग्न केले. दोघांची ओळख एका ऑनलाइन डेटिंग अॅपवर झाली होती. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दोघांचे लग्न थाटामाटात झाले.

लग्नानंतर सुरुवातीला सर्व काही सुरळीत चालले. मात्र काही दिवसानंतर ट्विशाच्या घरात वाद सुरु झाले. ट्विशाच्या कुटुंबीयांच्या मते, तिच्याकडून तिच्या सासर्‍यांकडून पैशांची मागणी होत होती. ट्विशाला तिच्या सासर्‍यांकडून मानसिक छळ सहन करावा लागत होता. समर्थदेखील तिच्यावर हळूवार पद्धतीने तणाव निर्माण करायचा. ट्विशा गर्भवती असताना समर्थ तिला संशयित करायचा: "तुझ्या पोटातील मुलगा कोणाचा आहे?" असेही तो तिला म्हणायचा.

ट्विशाच्या बहिणीच्या मते, समर्थ तिला रोज हिनवायचा: "मला फॉर्च्यूनर वाली मुलीची स्थळ हवी होती, तुझ्यासोबत लग्न करून मी फसलो" असे तो ट्विशाला म्हणायचा. या सगळ्या वादाला कंटाळून ट्विशा शर्मा आपल्या सासरी एक्सरसाइज रोडवर गळफास घेऊन आत्महत्या केली.या प्रकरणात ट्विशाचा नवरा फरार आहे. तसेच तिच्या सासुला अंतरिम बेल मिळाली आहे. ट्विशाच्या कुटुंबीयांनी ट्विशाने आत्महत्या केली नसून ही हत्या असल्याचा आरोप केला आहे. तिच्या शरीरावर काही जखमा आढळल्यामुळे हा संशय व्यक्त केला जात आहे.

ट्विशाच्या सासूने पत्रकार परिषदेत सर्व आरोप फेटाळले आहेत. शिवाय ट्विशा ड्रग्स घेणारी होती आणि ड्रग्स न मिळाल्यामुळे तिची चिडचिड वाढायची, असा आरोप सासूने केला.सध्या पोलीस सखोल चौकशी करत आहेत. हुंडा प्रथेमुळे गेलेल्या ह्या घटनेने देशात संतापाची लाट उडवली आहे. ट्विशा शर्माला न्याय मिळावा यासाठी सोशल मीडियावर युवक एकत्र आले आहेत.

सीएसआर पार्टनर सोबत जवळपास १५० कोटी रुपयाचे करार; मुख्यमंत्र्यानी दिली महत्त्वाची माहिती

पुण्यात गँगवॉर भडकले! वनराज आंदेकर हत्येचा बदला घेण्यासाठी तिसरा हल्ला;आरोपीच्या भावावर गोळीबार

https://youtu.be/5VsZrDEAR9Q?si=vTKicgQOSuyjuD7W

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra